गुप्तधनासाठी 5 वर्षीय मुलीचा बळी द्यायला गेला, भोंदूबाबाने 20 फूट खोल खड्डा केला अन्…जालन्यात संतापजनक प्रकार.

जालना जिल्ह्यात गुप्तधनाच्या लालसेपोटी अवघ्या 5 वर्षीय मुलीचा बळी द्यायला गेलेल्या भोंदू बाबाचा संतापजनक प्रताप उघडकीस आलाय .अंधश्रद्धेच्या विळख्यात नरबळी देण्याचा कट रचणाऱ्या भोंदू बाबाला जालना पोलिसांनी अटक केली आहे .  नरबळी देण्याची तयारी सुरू करत त्यासाठी 20 फूट खोल खड्डा घरात खोदल्याचेही पोलीस तपासात उघड झाले .या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे . राज्यात भोंदू बाबांची काही कमी नाही .भस्म अंगार्याच्या पुड्या हातावर ठेवत पैसे कमवण्यासाठी हे कुठल्याही थराला जातील याचा अनुभव जालना जिल्ह्यातून पुढे आलाय . पोलिसांनी या भोंदू बाबाला बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथून अटक केली आहे . आत्महत्येनंतर सापडलेल्या चिठ्ठीत लग्न झाल्यावर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आणि भोकरदन पोलिसांनी बुलढाण्यात जाऊन नरबळीचा हा कट उधळला आहे .  भोकरदन तालुक्यातील ज्ञानेश्वर आहेर यांनी 3 मार्चला आत्महत्या केली होती .त्यांच्याकडे मिळालेल्या चिठ्ठीत भोंदू बाबाच्या त्रासाला कंटाळून त्यात आत्महत्या करत असल्याचे समोर आले .या तपासा दरम्यान पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळाली .गुप्तधनासाठी एका पाच वर्षे मुलीचा नरबळी देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना आरोपीच्या चौकशीमधून मिळाली .

त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत . जिल्ह्यातील धामणगाव या गावात छापा टाकून आरोपी राहत असलेल्या घराचे तपासणी केली त्यावेळी घरात वीस फूट खोल खड्डा आढळून आला .याप्रकरणी जालना पोलीस अधिक तपास करत असून या संतापजनक घटनेची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी यांनी दिली आहे .पोलिसांनी भोंदूबाबाच्या हालचालींचा तपास घेतल्यानंतर माहिती मिळाली की, गुप्तधनासाठी एका 5 वर्षीय मुलीचा बळी देण्याची तयारी सुरू होती. या धक्कादायक माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने बुलढाण्यातील धामणगाव येथे छापा टाकला. छाप्यात आरोपीच्या घरात 20 फूट खोल खड्डा आढळून आला, जो नरबळीसाठी तयार केला जात होता, असा पोलिसांचा संशय आहे.

त्यामुळे या भोंदूबाबाच्या जाळ्यात अजून कितीजण आले? या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत असून, भोंदूबाबाने यापूर्वीही अशा घटना घडवून आणल्या आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली अशा प्रकारे नरबळी देण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आणि भयानक असून, या भोंदूबाबावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.