अखेर 6 दिवसानंतर सतीश भोसलेला बेड्या, आजच ट्रांझिट रिमांड घेणार; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनाक्रम सांगितला.

बीडचा नवा आका अशी ओळख निर्माण झालेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाई अखेर 6 दिवसानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.बीडचा नवा आका अशी ओळख निर्माण झालेल्या सतीश भोसले  उर्फ खोक्या भाई अखेर 6 दिवसानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. खोक्या हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. सतीश भोसलेला बीड पोलिसांनी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. काही दिवसांपासून फरार असलेला खोक्याचं  लोकेशन हे प्रयागराजला सापडल्याने अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान खोक्याचं  आजच ट्रांझिट रिमांड घेणार असून पुढील प्रक्रियापूर्ण करून त्याला बीडला आणलं जाईल, अशी माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एबीपी माझाला दिली आहे.गेल्या 6 दिवसांपासून फरार असलेला खोक्याला प्रयागराज येथेल विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. खोक्या उर्फ सतीश भोसलेवर जेव्हा गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून तो फरार होता.

त्याचा शोध सातत्याने पोलीस घेत होते. दरम्यान त्याचं शेवटचं लोकेशन हे प्रयागराजला सापडून आलं होतं. त्यामुळे आम्ही युपी पोलीस आणि प्रयागराज येथील पोलिसांशी समन्वय साधत आज आम्ही त्याला अटक केली आहे. परिणामी आमचे पथक मार्गावर असून त्याला आज किंवा उद्या बीड येथे आणण्यात येईल. दुसऱ्या राज्यात त्याला अटक केली असल्याने त्याला ट्रांझिट रिमांडवर घ्यावे लागणार आहे. स्थानिक न्यायालयाची आणि पोलिसांची परवानगी घेऊन ही प्रक्रिया केली जाणार आहे. अशी माहिती बीड ते पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे.

दरम्यानच्या काळात, मीडियाला सतीश भोसले मुलाखत देतो, मात्र पोलिसांना सापडत नाही, अशा आशयच्या  बातम्या टीव्हीवर येत होत्या. मात्र असं म्हणणं चुकीचं ठरेल. आम्ही सातत्याने त्याच्या मार्गावर होतो. पोलीस आणि मीडिया या दोन वेगळे प्रकार आहे. त्यामध्ये दोन्हीची कार्याप्रणाली वेगळी आहे. किंबहुना सतीश भोसले याला पळून जाण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असेही स्पष्टीकरण नवनीत कॉवत यांनी दिलं आहे. आणि प्रयागराज पोलिसांच्या प्रयत्नांनी त्याला अटक करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.