जळगाव – व्यसनमुक्त समाज तू घडवण्यासाठी एका सातवीतील विद्यार्थिनीच्या शब्दांनी परिवर्तनाची दिशा दाखवली आहे! “व्यसनांचा आहारी जाऊ नका भावांनो” या प्रभावी कवितेसह कु. वेदांशी वैशाली गजानन पाटील हिने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्र शासनाच्या “व्यसनमुक्त महाराष्ट्र” अभियानांतर्गत तिच्या कवितेची जिल्हास्तरीय निवड झाली असून, हे पोस्टर जळगाव जिल्ह्यातील सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये आणि शाळांमध्ये झळकणार आहे.या कवितापोस्टरचे प्रकाशन जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जनमानवता बहुद्देशीय संस्था, चोपडा चे अध्यक्ष राज मोहम्मद खान शिकलगर आणि Freelancer Election Campaign Management Company चे प्रमुख उमेश शहादू मराठे यांची उपस्थिती होती.

लहानशी कवयित्री, मोठा सामाजिक संदेश अवघ्या सातवीत शिकणाऱ्या वेदांशीने आपल्या कवितेतून समाजाला व्यसनमुक्तीचा जोरदार संदेश दिला आहे. मद्य, तंबाखू आणि इतर व्यसनांचे दुष्परिणाम तिने अतिशय समर्पक शब्दांत मांडले आहेत. तिच्या या कृतीमुळे अनेक विद्यार्थी आणि नागरिकांना विचार करायला भाग पाडणारा संदेश मिळणार आहे.
यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी वेदांशीच्या सामाजिक जाणिवेचे आणि लेखणीच्या प्रभावीतेचे कौतुक केले. लहान वयातच तिने मोठ्या समस्येकडे लक्ष वेधत समाजप्रबोधनाचा पुढाकार घेतला आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.वेदांशीच्या कलेची दखल घेत जळगाव जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था आणि शाळांनीही तिच्या कवितेला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा युवा प्रतिभांमुळे महाराष्ट्राचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचे जाणकार सांगत आहेत.









