मध्यप्रदेशातील एका कोळसा खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. कोळसा खाणीचा एक भाग कोसळल्याने कामगार ढिगाऱ्याखाली दबले आहेत. यामध्ये ३ कामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे.मध्यप्रदेशातील एका कोळसा खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. बैतूल जिल्ह्यातील कोळसा खाणीचा एक भाग कोसळल्याने कामगार ढिगाऱ्याखाली दबले आहेत. यामध्ये ३ कामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. घटना घडताच एसडीआरएफ आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरु आहे.
वृत्तानुसार, गुरुवारी बैतूलमधील पाठाखेडा परिसरात वेस्टर्न कोल फील्ड (WCL)च्या कोळसा खाणीचे १० मीटरचे छत कोसळले आहे. खाणीच्या छत्तरपूर-१ या फेजपासून सुमारे ३.५ किमी अंतरावर असलेल्या कॉन्टूर मायनर सेक्शनमध्ये कामगार काम करत होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली.दुपारी ३ वाजता ही दुर्घटना घडली आहे. कोळसा खाणीच्या आत कोसळा कापण्यासाठी कंट्युनर मायनर मशीन सुरु होती, यावेळी अचानक खाणीचे छत कामगारांवर कोसळले, तेव्हा ही दुर्घटना घडली आहे. घटनेपूर्वी, अधिकारी आणि कामगार खाणीची पाहणी करण्यासाठी खाली उतरले होते.










