पुण्यात गुंड गजा मारणे टोळीचा धुमाकूळ, केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातील व्यक्तीस मारहाण.

 पुण्यात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने घडत असतात. नुकतीच पुण्यात एका पोलिसाला मारहाण झाली होती. आता पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीस मारहाण झाली आहे.पुण्यात पुन्हा एकदा गजा मारणे टोळीचा उन्माद दिसून आला आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये काम पाहणाऱ्या व्यक्तीस मारहाण झाली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मीडियाचं काम पाहणाऱ्या व्यक्तीला गजा मारणे टोळीकडून बेदम मारहाण.

थेट केंद्रीय मंत्र्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याने खळबळ. मारहाण करणारे आरोपी नुकतेच जामिनावर सुटल्याची माहिती. स्वतः केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जखमी असलेल्या व्यक्तीची व्हिडिओ कॉलवर केली विचारपूस.केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ऑफीसमध्ये सोशल मिडियाचे काम करणाऱ्यास मारणे टोळीने बेदम मारहाण केली.या मारहाणीत त्याच्या नाकावर गंभीर जखम झाली आहे. हाँर्न वाजवत गाड्यांचा ताफा घेऊन जाताना वाद झाल्याची माहिती. स्वत: केंद्रीय मंत्र्यांनी व्हिडीओ कॉल करुन जखमीची चौकशी केली. सर्व आरोपी नुकतेच जामिनावर बाहेर आले आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मारणेचा भाचा फरार आहे.पुण्यात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने घडत असतात. नुकतीच पुण्यात एका पोलिसाला मारहाण झाली. कोम्बिंग ऑपरेशन करून घरी निघालेल्या एका पोलिसाला सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात चौघा दारुड्यानी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. पोलिसाचा मोबाईल हिसकावला. संबंधित पोलिसाने याबाबत चतुःश्रृंगी पोलिसाकडे तक्रार नोंदवली आहे. पुण्यात वाहनांच्या तोडफोडीच्या सुद्धा अनेक घटना घडल्या आहेत. पुण्यात एकाचवेळी अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. स्थानिक गुन्हेगारी वाढल्याचे हे संकेत आहेत.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.