कल्याणमध्ये चुलत भावाला भयंकर पद्धतीने संपवलं, आधी गोळी मारली मग डोक्यात आठवेळा चाकू खुपसला.

कल्याणमध्ये बुधवारी मध्यरात्री एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. या व्यक्तीचा पाठलाग करुन भयंकर पद्धतीने त्याचा शेवट करण्यात आला. कोळशेवाडी पोलिसांनी आरोपीला पकडलं कल्याणधील काटेनमोली परिसरात बुधवारी रात्री एका व्यक्तीचा खून करण्यात आला. येथील नाना पावशे चौकात ही घटना घडली. रंजीत दुबे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रंजीत दुबे (याची त्याचा चुलत भाऊ राम सागर यानेच त्याची हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रंजीत दुबे आणि रामसागर यांच्या कुटुंबात गावच्या जमिनीवरुन वाद होता. याच वादातून राम सागर यांनी आपल्या चुलत भावाला निर्घृणपणे संपवले. या घटनेनंतर कोळशेवाडी पोलिसांनी राम सागर याच्यावर गुन्हा दाखल केला होता. अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी राम सागर याला बेड्याही ठोकल्या.

या घटनेनंतर रंजीत दुबेच्या बहिणीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने हा सगळा प्रकार कसा घडला, याचा तपशील सांगितला. राम सागरने माझ्या मोठ्या भावाला मारले. त्याने पहिले माझ्या भावावर गोळी  झाडली. ती गोळी माझ्या भावाच्या बरगड्यांजवळ लागली. त्यामुळे त्याला थोडीशी इजा झाली. त्यानंतर माझा भाऊ स्वत:ला वाचवण्यासाठी पळत होता. तो इमारतीचे पाच मजले चढून वर आला. त्याला धावताना दम लागल्यामुळे तो लिफ्टजवळ खाली पडला. त्यावेळी राम सागरने माझ्या भावाच्या डोक्यात आठ वेळा चाकू खुपसला. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे रंजीत दुबेच्या बहिणीने सांगितले.

काही दिवसांपूर्वी राम सागर याने माझ्या भावाला मारले होते. तेव्हा माझ्या भावानेही त्यांच्या घरी जाऊन राम सागरच्या वडिलांना मारले. पण आता राम सागरने माझ्या भावाचा जीवच घेतला. काही दिवसांपूर्वी गावी जमिनीच्या वादातून राम सागर याने माझ्या आई-वडिलांना मारले होते. आतात्याने माझ्या भावालाही ठार मारून टाकले, असे सांगताना रंजीत दुबेची बहीण धाय मोकलून रडत होती. सध्या कोळशेवाडी पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु असून राम सागरच्या चौकशीत आणखी काय माहिती पुढे येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.