पुण्यातील बाणेरमध्ये सापडलेली ‘ती’ बॉडी कोणाची? एक पुरावा पोलिसांनी लावला तपास

 झारखंड येथील बांधकाम मजुराचा बाणेर येथे खून झाल्याने पोलिसांनी आरोपी धोनू मोटका टुडूला अटक केली. आरोपीने दारू पिताना झालेल्या वादातून खून केल्याचे कबूल केले. लोणी काळभोर परिसरात अवैध दारू विक्रीवर गुन्हे शाखेच्या युनिट सहाने कारवाई करून ११ लाख ६० हजार रुपयांचा साठा जप्त केला. आरोपी मुकेश कर्णावत पळून गेला.झारखंड येथील बांधकाम मजुराचा बाणेर येथे खून झाला असून, या प्रकरणी एका आरोपीला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. सुनील अमोल टूडू (वय ३२, मूळ रा. झारखंड) असे खून झालेल्याचे नाव आहे. धोनू मोटका टुडू (वय २३, मूळ रा. झारखंड) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सोमवारी रात्री बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लब रस्ता येथे घडला. पोलिसांना मंगळवारी दुपारी बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लब येथे मृतदेह आढळल्याचा फोन आला होता. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली; तसेच मृताची ओळख पटवून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, दारू पिताना वाद झाला आणि त्या वादातून खून केल्याचे धोनू मोटका टुडूने चौकशीत कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.पुणे : लोणी काळभोर परिसरात अवैध गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर कारवाई करून पोलिसांनी ११ लाख ६० हजार रुपयांचा साठा जप्त केला. गुन्हे शाखेच्या युनिट सहाने मंगळवारी रात्री ही कारवाई केली. मात्र, कारवाईदरम्यान आरोपी मुकेश कर्णावत पळून गेला असून, त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना लोणी काळभोर परिसरातील रामदरा भागात हातभट्टीवर दारू बनवण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. पोलिस आल्याचे कळताच आरोपी पळून गेला.या कारवाईत पोलिसांनी दीड हजार लिटर तयार दारू, २० हजार लिटर रसायन आणि दारू बनवण्यासाठी लागणारी मोटार, ड्रम, एअर ब्लोअर असा ११ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. युनिट सहाचे पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.