निंभोरा बु. येथे गटारीचे पाणी थेट रस्त्यावर ..

निंभोरा बु. येथे गटारीचे पाणी थेट रस्त्यावर, अंगणवाडी व शिवमंदिर प्रांगणात भाविक व बालकांचे आरोग्य धोक्यात.

रावेर प्रतिनिधी:- प्रदीप महाराज

येथील वार्ड क्रमांक ६ स्टेशन परिसरा मध्ये संभाजीनगर मधील अंगणवाडी व शिवमंदिर प्रांगणात थेट गटारीचे पाणी साचत असल्याने याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले असून पावसाळा असल्याने ही समस्या जास्त प्रमाणात उद्भभवत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की वार्ड क्रमांक ६ मधील संभाजीनगर मधील नवीन विस्तारित भागात गटार बांधकाम केल्याने व तिला पुढे पाण्याच्या निचरा होण्यासाठी मार्गच नसल्याने हा प्रश्न जटिल झाला आहे. त्यात पावसाळा सुरू झाल्यापासून गटारीचे पाणी थेट अंगणवाडी व शिवमंदिर प्रांगणात साचत असल्याने या ठिकाणी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाली असून या भागातील रहिवाशांनी अनेक वेळा सांगूनही उपाययोजना झाली नाही साचत असलेल्या या पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या भागात अंगणवाडी मागील ओपन स्पेस मध्ये पाणी सोडलेले होते मात्र काही दिवसा अगोदर येथे शोषखड्ड्याचे काम सुरू केले होते.मात्र येथील काही स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्याने ही शोषखड्ड्याची योजना गुंडाळण्यात आली आहे व त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. झालेल्या या दूरदर्शतेमुळे परिसरातील नागरिकांसह मंदिरात येणाऱ्या भाविकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासना संदर्भात तीव्र नाराजी असून ही समस्या न सुटल्यास ग्रामपंचायत समोर उपोषण केले जाईल व मोठे आंदोलन उभारण्यात येईल अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. यासंदर्भात संबंधित ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी वरील ठिकाणी कर्मचारी पाठवून माहिती घेतो व पुढील योग्य ती कारवाई करतो असे सांगितले. आरोग्याशी संबंधित सांडपाण्याच्या संदर्भातला हा अतिशय गंभीर प्रश्न सोडवावा.

” गटारीचे सांडपाणी थेट अंगणवाडी व शिवमंदिर प्रांगणात सोडल्याने लहान बालकांनसह रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे ही समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन केले जाईल ” शुभम रामदास महाजन स्थानिक रहिवासी. ” सांडपाण्याच्या या समस्ये संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक ग्रामपंचायत सदस्य म्हणून रहिवाशांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.”
ग्रामपंचायत सदस्य सौ.शाहीन दस्तगीर खाटीक.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.