चोपडा भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्षाची गळफास घेऊन आत्महत्या….

चोपडा भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्षाची गळफास घेऊन आत्महत्या….

जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी

चोपडा तालुक्यातील घुमावल येथिल राहणारे भाजपाचे कट्टर,व सच्चा कार्यकर्ता प्रकाश लक्ष्मण पाटील यांनी आज सकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पोलिस सूत्राकडून माहितीवरून कळविण्यात आले. पोलिस सूत्राकडून मिळाल्या माहिती नुसार तालुक्यातील घुमावल येथील येथील माजी सरपंच पंचायतराज व ग्रामविकास संयोजक जळगाव जिल्हा पूर्व भागाचे प्रकाश (पप्पु ) लक्ष्मण पाटील वय 44 यांनी आज सकाळी साडेसात आठ दरम्यान घुमावल पासून आपल्या शेतात झाडाला दोरी बांधून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण चोपडा तालुक्यात वार्ता वाऱ्यासारखी पसरली व सर्वपक्षीय लोकांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन हळहळ व्यक्त करत होते. सकाळी सहा वाजता घरातून निघाल्यानंतर आपल्या घरापासून जवळपास दीड किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या शेतात प्रकाश गेला असता काही वेळाने त्याच्या मुलगा अविनाश हा शेतात गेला असता शेतात वडील दिसून येत नाही त्यामुळे तो घराकडे परतला व काकांना सर्वे हकीगत सांगितले तर नंतर काका प्रकाश ला बघण्यासाठी गेले असता तर दोन शेत आधीच चप्पल दिसले त्यावरून काकांनी शोध सुरू केला असता तर प्रकाश पाटील येणे झाडाला गळफास घेऊन घेतले आहे असे चित्र समोर दिसल्यावर भावाने हंबरडा फोडताच गावाकडे धाव घेतली व गावात सांगितल्यावर शेतात कडे अनेक लोक धावून गेली एका नायलॉन दोरीने गळफास घेतलेला होता तदनंतर पोलिसांना कळविण्यात आले याबाबत गावात आश्चर्य व्यक्त होत होता की पप्पूने असा चुकीचा पाऊल का उचलला असावा याबाबत प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण होत होत्या दुपारी जवळपास एक वाजेच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले तेव्हा मात्र डॉक्टर सुरेश पाटील यांनी पाहिले असता मृत घोषित केले

आत्महत्याचे कारण नेमके काय असावे याबाबत उपजिल्हा रुग्णालय येथे शंका कुशंका सुरू होत्या लोकांच्या बोलण्यावरून गावातील जुन्या वादावरून पप्पूला काही दिवसापूर्वी मारले होते अशी ही चर्चा होती व काही लोक हेही सांगत होते की कपाशीच्या गाड्या कमिशन बेसेस वर पप्पू हा व्यापाऱ्यांना गाड्या भरून द्यायच्या परंतु त्यातील काही पैसे वापरून गेले होते त्यामुळे त्याच्यावर कर्ज झाल्याचे देखिल बोलले जात होते. अश्या अनेक प्रकारच्या विषय तिथे चर्चिले जात होते.यावरून काही एक स्पष्ट होत नव्हते. परंतु अनेक चर्चाला उधाण आले होते. याबाबत चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.प्रकाश पाटील हा 20 तारखेला भाजपाच्या बैठकिला जाण्यासाठी तयारी करत होता असे ही भाजपाचे त्यांचे मित्रानी सांगितले होते. प्रकाश पाटील यांना धर्मपत्नी व दोन मुले , तीन भाऊ आणि चार बहीणि असा मोठा परिवार होता.प्रकाश पाटील यांनी काल दुपारी जय श्रीराम असा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल केला होता त्यामुळेच सर्वांना ह्या आत्महत्या बद्दल आश्चर्य वाटत

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.