जालना : जालना ते राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ एका विहिरीत काळी पिवळी जीप कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्देवी घटनेत विहिरीतून पाच प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती आहे. तीन जण जिवंत आहेत. त्यांना जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना आज (दि.१८ ) सायंकाळी साडे पाच वाजता घडली.
अपघातग्रस्त जीप अद्याप विहिरीतच असून ती काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जीपमध्ये किती जण होते, हे कळू शकले नाही. या अपघातील बहुतांश प्रवासी हे पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी गेले होते. तेथून ते बसने जालना येथे परतले व गावी परतत असताना त्यांच्यावळ काळाने घाला घातला.