जल जीवन मिशन अंतर्गत १००% नळजोडणी पूर्ण करत जळगाव जिल्ह्याने राज्यात मिळवले पहिले स्थान.

जल जीवन मिशन अंतर्गत १००% नळजोडणी पूर्ण करत जळगाव जिल्ह्याने राज्यात मिळवले पहिले स्थान. जळगाव – ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला नळाचे पाणी उपलब्ध करून देणे हा जल जीवन मिशन या योजनेचा मुख्य हेतू आहे. जळगाव जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत सर्व कामे उत्तमरित्या पुर्ण करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्याने जल जीवन मिशन अंतर्गत महत्वपुर्ण कामे करत १००% नळजोडणी पूर्ण करून राज्यात पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील जलजीवन मिशनचा आढावा घेण्यात आला.

जल जीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण कुटुंबांची नळजोडणी १००% पूर्ण झाली आहे. यात ६.९१ लाख ग्रामीण कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली आहे. महाराष्ट्राची एकूण नळजोडणी ८८.१३% आहे, त्यामुळे जळगाव राज्याच्या सरासरीच्या तुलनेत पुढे आहे.
जळगावने पाणी गुणवत्ता चाचणीमध्ये ९८.६६% गावांची तपासणी पूर्ण केली आहे, ज्यात जळगावचा राज्यात ६ वा क्रमांक आहे. तर जळगावने रासायनिक जल चाचणीमध्ये ९२% गावे तपासली आहेत, पण धुळे (९८.५१%) पेक्षा ६.५१% ने मागे आहे. राज्यात अजून काही जिल्ह्यांनी ९५% पेक्षा अधिक चाचणी पूर्ण केली आहे, जळगावने १००% ग्रामीण नळजोडणी पूर्ण करून हे सर्वोच्च स्थान मिळवले आहे. यात केवळ ‘हर घर जल’ प्रमाणन आणि रासायनिक जल चाचणीमध्ये सुधारणा आवश्यक आहे, त्या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करत आहे. गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जळगावने ‘हर घर जल’ प्रमाणन मिळवणाऱ्या गावांची संख्या वाढवणे आणि रासायनिक जल चाचणीचे प्रमाण वाढवण्यावर भर देण्याची गरज असून यापुढे त्यावर काम केले जाईल असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.