वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांना गती द्यावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ.

 राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत सुरू असलेल्या नियोजित बांधकाम प्रकल्पांना गती देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून कामांची गुणवत्ता राखून काम वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत होणाऱ्या नियोजित बांधकामाचा व विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी मंत्री  मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, आयुक्त राजीव निवतकर, संचालक अजय चंदनवाले उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी अमरावती व लातूर येथे होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे होणाऱ्या मानसिक आरोग्य केंद्राचे व वाशिम येथे होणाऱ्या सर ज.जी. रुग्णालय येथील मुलांचे वसतिगृह व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेतला. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ, पालघर व हिंगणघाट येथील बांधकामासंदर्भात सद्य:स्थिती जाणून घेतली. हिंगोली, नाशिक, गडचिरोली, सांगली, मुंबई येथे होणाऱ्या नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन-2025 मध्ये सादर होणाऱ्या पुरवणी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी बैठकीत ”वाय फाय कॅम्पस” प्रकल्प, हिमोग्लोबिन टेस्ट मिटीर अँड स्ट्रिप्स, सादरीकरण, NAT Testing बाबत उपस्थित असलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..