शिक्षक की हैवान? शिक्षकाच्या मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटला; मुंब्य्रातील शाळेतील प्रकार.

एका विद्यार्थ्याच्या कानाखाली जोरात मारल्याने त्याच्या डाव्या कानाचा पडदा फाटल्याचा प्रकार मुंब्रा येथे घडला. याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शाळेतील दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणामुळे शिक्षकाने त्यांना मारहाण केली. यातील एका विद्यार्थ्याच्या कानाखाली जोरात मारल्याने त्याच्या डाव्या कानाचा पडदा फाटल्याचा प्रकार मुंब्रा येथे घडला. याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.मुंब्रा येथील शाळेत आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षांच्या विद्यार्थ्याला अन्य एका विद्यार्थ्याने धक्का दिला. यातून त्यांच्यात भांडण झाले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांकडे पाठवण्यात आले. ते पुन्हा वर्गात आल्यानंतर या शिक्षकाने त्यांना मारहाण केली. त्याने एका विद्यार्थ्याच्या कानाखाली चार ते पाच वेळा मारले.

हाताच्या कोपऱ्यानेही त्याला मारहाण केली. १७ जानेवारीला सकाळी हा प्रकार घडला.विद्यार्थ्याच्या डाव्या कानातून पाणी येऊ लागल्याने पालक त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याच्या कानाचा पडदा फाटल्याची बाब समोर आली. त्याच्या आईच्या तक्रारीनंतर मंगळवारी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यासंदर्भात आरोपीला नोटीस देण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.गृहपाठ न केल्याने संतापलेल्या खासगी शिकवणीतील शिक्षकाने दुसरीतील विद्यार्थ्याला काठीने मारहाण केल्याची घटना अंधेरीच्या साकीनाका परिसरातून समोर आली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या नऊ वर्षांच्या मुलाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शिक्षकाविरुद्ध साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकीनाका येथील शाळेत शिकणारा हा मुलगा शाळा सुटल्यावर सायंकाळी पाचच्या सुमारास याच परिसरात असलेल्या एका खासगी शिकवणीत जातो. मंगळवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे या मुलाच्या आईने त्याला शिकवणीत सोडले. मात्र अर्ध्या तासातच तो रडत घरी आला. त्याच्या हातामधून रक्त येत होते. त्याच्या पाठीवरही वळ होते.मुलाला शांत करून आईने विचारले असता, त्याने शैलेश शेट्टी या शिक्षकाने पट्टी आणि काठीने मारहाण केल्याचे सांगितले. या मुलाच्या आईने फोनवर वडिलांना माहिती दिल्यानंतर ते घरी पोहोचले. मुलाच्या अंगावरील जखमा पाहून त्यांनी शिक्षक शैलेश शेट्टी याला फोन केला. त्याला मारहाणीबाबत विचारणा केली. त्यावर गृहपाठ न केल्याने मारल्याचे त्याने सांगितले. अशी मारहाण करण्याचा काय अधिकार, असा सवाल करताच शेट्टी याने धमकी दिल्याचे पीडित मुलाच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून साकीनाका पोलिसांनी शेट्टी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..