मुंबईत २० वर्षीय तरुणीवर रिक्षा चालकाचा अत्याचार, स्टेशनबाहेरच भयंकर अवस्थेत सापडली.

मुंबईत एका २० वर्षीय तरुणीवरह अत्याचार करुन तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत एक धक्कादायक घटना घडल आहे. येथील राममंदिर स्थानकाजवळ एक २० वर्षीय तरुणी बेशुद्धावस्थेत आढळून आली आहे. या तरुणीवर क्रूरपणे लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिच्यावर सिझेरियन ब्लेड, तसेच दगडांसह अज्ञात वस्तूने हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
पीडितेवर अज्ञात रिक्षाचालकाने हल्ला केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला असून या भीषण गुन्ह्याची नोंद करुन तपास सुरू आहे. गोरेगाव पूर्व येथील वनराई पोलीस स्टेशन परिसारत ही घटना घडल्याची माहिती आहे.

मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानक परिसरात एक २० वर्षीय तरुणी बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. तसेच, तिच्यावर सिझेरियन ब्लेडने हल्लाही करण्यात आला. इतकंच नाही तर या तरुणीच्या गुप्तांगात दगडाचे काही तुकडेही आढळून आले आहेत.राम मंदिर रेल्वे स्थानक परिसरात एक तरुणी बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती वनराई पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर या मुलीने पोलिसांना जबाब दिला. तिच्या जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तरुणीच्या जबाबानुसार पोलिसांनी आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे.पिडीत तरुणीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार आहेत. जेव्हा ती पोलिसांना सापडली तेव्हा तिची अवस्था अत्यंत वाईट होती. तिच्या शरिरावर जखमा होत्या. मात्र, आता उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर असून सुधारत असल्याची माहिती आहे.ही घटना कशी घडली, रिक्षा चालकाने तरुणीला कुठून आणलं, त्यांच्यात नेमकं काय झालं, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. सध्या याप्रकरणात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. आरोपी रिक्षा चालकाची चौकशीही सुरु आहे. तपासाअंती हा रिक्षा चालक कोण आहे, कुठे राहणारा आहे, तो तरुणीला कुठे भेटला, तो तिला राम मंदिर परिसरात कसा घेऊन आला, तिच्यावर कुठे अत्याचार केले, या सर्वबाबी उघड होणार आहेत.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..