१५ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्ती बाईकवर बसवलं, हॉटेलमध्ये नेत विश्वासघात; मित्राच्या मदतीने.

 ग्रामीण भागातून शहरी भागात दररोज विद्यार्थिनींना घरापासून पायी आपल्या गावानजीकच्या बस थांब्यापर्यंत किंबहुना त्या शाळेत किंवा कॉलेजपर्यंत जाण्याकरीता ये-जा करावी लागते. अशातच अशा घटनांमुळे परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर आपली मुलगी घरातून शाळेपर्यंत जात असताना तिला काही प्रमाणात आता घरातूनच सुरक्षेचे धडे देणे गरजेचे आहे.बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात एक खळबजनक घटना घडली. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला मित्राच्या मदतीने जबरीने मोटरसायकलवर बसवलं. त्यानंतर परिसरातील हॉटेल निवांत येथे नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमासह आणि त्यास मदत करणाऱ्या मित्राविरुद्ध पोक्सोसह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे

१६ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना आरोपी मोहन उर्फ राज चव्हाण (वय २०, रा. खंडाळा देवी) यांनी पिढीतेस त्याच्या मित्र ओम पल्हाड अंदाजे यांच्या मदतीने मेहकर बायपासवरील हॉटेल निवांतच्या रूममध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास डीवायएसपी प्रदीप पाटील हे करत आहे.

ग्रामीण भागातून शहरी भागात दररोज विद्यार्थिनींना घरापासून पायी आपल्या गावानजीकच्या बस थांब्यापर्यंत किंबहुना त्या शाळेत किंवा कॉलेजपर्यंत जाण्याकरीता ये-जा करावी लागते. अशातच अशा घटनांमुळे परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर आपली मुलगी घरातून शाळेपर्यंत जात असताना तिला काही प्रमाणात आता घरातूनच सुरक्षेचे धडे देणे गरजेचे आहे. तिचा कोणी पाठलाग किंबहुना तिला कोणी त्रास देत असेल तर त्वरित तिने आपल्या घरातील पालकांपर्यंत सांगणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात होणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल. कारण भीतीपोटी तथा बदनामीपाई अनेक वेळा अशा घटना सुरुवातीलाच घरी सांगितल्या जात नाही आणि त्याचा पुढे मोठा परिणाम व अनर्थ होतो.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.