माजी पोलीस उपायुक्त मंगलसिंग सुर्यवंशीच्या हस्ते चेतन जैन यांचा सत्कार. एखादा अधिकारी रिटायर्ड झाल्यावर किंवा एक बदली झाल्यावर सहसा त्या गावाशी किंवा तेथील लोकांशी समंध ठेवत नसतो आणि त्यातल्या त्यात पोलीस खात्यातील अधिकारी तर अजिबातच नाही कारण आपला कार्यकाळ संपला की ते दुसऱ्या गावी आपले बस्तान जमवतात. अशी एक म्हण आहे की पोलीस सख्या बापालाही होत नाहीत पण बोटावर मोजण्या इतके अधिकारी सर्वांशी मैत्री जपतात त्या गावाशी संपर्क ठेवतात.असेच पोलीस खात्यातील माजी पोलीस उपायुक्त मंगलसिंग सुर्यवंशी हे चोपडा येथे जवळपास अठरा वर्षांपूर्वी पोलीस निरीक्षक म्हणून अतिशय शीस्तप्रिय आणि दरारा असलेले अधिकारी म्हणून त्यांची ख्याती महाराष्ट्रभर आहे.
त्यांची चोपडा शहराशी नाळ अजूनही त्यांनी जुळवून ठेवली आहे नुकतेच चोपडा शहरातील पत्रकार लतीश जैन यांचे पुतणे चेतन सुनील जैन यांनी एलएलबी चे शिक्षण पूर्ण करून डिग्री मिळवली त्याबद्दल माजी पोलीस उपायुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांनी चेतन जैन यांचा सत्कार त्यांच्याकडे जाऊन केला.त्यावेळी चोपडा शर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे पत्रकार लतीश जैन,सुनील जैन आकाश जैन,सौ.पिस्ता जैन,सौ.त्रिशला जैन, कु.नेतल जैन हे उपस्थित होते. त्यांचा या सत्काराबद्दल चोपडा शहरातच नव्हे तर जिल्ह्याभरात चर्चा सुरू झाली आहे. पोलिस उपायुक्त मंगलसिंग सुर्यवंशी यांनी घरी येऊन सत्कार केल्यामुळे जैन कुटुंब त्यांच्या प्रेमात भारावून गेले होते. अनेक जुन्या आठवणी काढत लतीश जैन यांच्या घरात गप्पाची मैफिल भरली होती दीड ते दोन तास गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. संबंध जोपासणे नव्हे तर माणूस जोडून धरण्याची कला श्री सुर्यवंशी मध्ये पाहायला मिळाली.