सामाजिक सौहार्द जपण्यासाठी रावेर पोलीस ठाण्याचा अभिनव उपक्रम.

सामाजिक सौहार्द जपण्यासाठी रावेर पोलीस ठाण्याचा अभिनव उपक्रमपोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सामाजिक सलोखा आणि सर्वधर्म समभाव वाढवण्यासाठी रावेर पोलीस ठाण्याच्या वतीने “एकता क्रिकेट कप २०२५” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचा उद्देश विविध धर्मीयांमध्ये ऐक्य, सलोखा आणि परस्पर सामंजस्य वाढवणे हा होता.

क्रिकेटच्या माध्यमातून एकतेचा संदेशरावेर येथील व्ही.एस. नाईक कॉलेजच्या मैदानावर या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले. यात रसलपुर रॉयल, वाघोड वॉरियर्स, रावेर टायगर्स, पाल रॉयल, के-हाळा फायटर्स आणि होमगार्ड पोलीस पाटील पत्रकार अशा सहा संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्यात रसलपुर रॉयल संघाने वाघोड वॉरियर्स संघावर विजय मिळवत “एकता क्रिकेट कप २०२५” जिंकला. संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. रितेश पवारने “मॅन ऑफ द मॅच” आणि “मॅन ऑफ द सिरीज” दोन्ही किताब पटकावले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अतुल विंचुरकर तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मुजाहिद यांना गौरविण्यात आले.

प्रमुख उपस्थिती आणि सहकार्यया उपक्रमाचे उद्घाटन जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी श्री.अंकीत यांच्या हस्ते झाले. सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, तहसीलदार बंडु कापसे, गटविकास अधिकारी खेमचंद वानखेडे आणि विविध धर्मीय प्रतिष्ठित नागरिकांनी या उपक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उप निरीक्षक घनश्याम तांबे, पोलिस हेड कॉनिस्टेबल विठ्ठल देशमुख, पोलिस नाईक पुरुषोत्तम पाटील आणि पोलिस कॉनिस्टेबल नितीन सपकाळे यांनी विशेष मेहनत घेतली. सामाजिक सलोखा वाढवण्याचा आदर्श उपक्रमरावेर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित “एकता क्रिकेट कप” हा सामाजिक सलोखा जपण्यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे. या उपक्रमामुळे समाजातील विविध घटकांमध्ये एकात्मतेचा संदेश पोहोचला असून नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

  • Related Posts

    “आपला विश्वास हीच माझी ताकद आहे – मंत्री गुलाबराव पाटील.

    “आपला विश्वास हीच माझी ताकद आहे – मंत्री गुलाबराव पाटील १७ कोटी निधीतून जळगाव तालुक्यातील १८ किलोमीटर रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न  मंत्री पाटील यांनी जळगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगिक वाढ, आणि…

    महाज्योती या संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र सुरू करण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

    महाज्योती या संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र सुरू करण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.पुढील १०० दिवसांमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाने करावयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावामहात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    “आपला विश्वास हीच माझी ताकद आहे – मंत्री गुलाबराव पाटील.

    “आपला विश्वास हीच माझी ताकद आहे – मंत्री गुलाबराव पाटील.

    योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्यापोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार  एआय तंत्राचाही वापर नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्यापोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार  एआय तंत्राचाही वापर नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    महाज्योती या संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र सुरू करण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

    महाज्योती या संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र सुरू करण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

    शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु करावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु करावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास शालेय शिक्षण विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण

    शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास शालेय शिक्षण विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण

    केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्या:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्या:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस