अवैध वृक्षतोड वन विभागासाठी नित्याची बाब ठरली आहे. एकिकडे दरवर्षी वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असताना, खाजगी ठेकेदार काही वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जंगलाचा सफाया करीत आहे.
एरंडोल वनपरिक्षेत्रातील शेकडो अवैध वृक्षतोडीचा हा गोरखधंदा कधी थांबणार, असा प्रश्न नागरिकांना कडुन उपस्थित केला जात आहे. मात्र असे असताना वन विभाग झोपलेल्या अवस्थेत का आहे. आज पर्यंत एरंडोल तालुक्यात एक ही कठोर कारवाई वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली दिसुन आलेली नव्हती, संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने हा गोरख धंदा सुरू आहे असेल लाकूडतोड स्वतः व्हिडिओमध्ये बोलत आहे. आम्ही अधिकाऱ्यांना हप्ता देतो तरच आमचे लाकूडतोड सुरू असतात. तसेच संरक्षित वन परिसरातील वृक्षाचे रक्षण करणे व अवैध वृक्षतोड थांबवणे, अवैध लाकूड वाहतुकीवर कारवाई करणे वनविभागयांच्याकडून अपेक्षित आहे. या विभागांचे दुर्लक्ष होत आहे.