धरणगाव महसूल प्रशासनाने अवैध वाढू चोरी रोखण्यासाठी कसली कंबर

धरणगाव महसूल प्रशासनाने अवैध वाढू चोरी रोखण्यासाठी कसली कंबर वाळू ने भरलेले ट्रॅक्टर परस्पर पळविल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल.

धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर -धरणगाव : सदरील वृत्त असे की, महसूल विभागाने अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी पावली उचललेली आहेत. वाळूची होणारी चोरटी वाहतूक थांबवण्यासाठी धरणगाव महसूल विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. धरणगाव महसूल विभागात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मीकांत बाविस्कर (सोनवद मंडळ अधिकारी ) यांची दर आठवड्याला एका दिवसासाठि मंगळवारी ड्युटी ही लागलेली होती. वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नदीपात्रात ड्युटी ही लागलेली होती. दिनांक 3 रोजी आव्हानी शिवारात गिरणा नदी पात्रात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सदरील ड्युटीवर असलेले लक्ष्मीकांत वसंत बाविस्कर व त्यांच्या सोबत असलेले तलाठी राकेश पाटील, व मंडळ अधिकारी भरत पारधी धरणगाव हे सोबत होते. यांना काही ट्रॅक्टर मध्ये अवैध वाढू भरताना आढळून आले.

त्या ठिकाणी उपस्थित असलेले मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत बाविस्कर यांनी त्यांच्याजवळ जाऊन विचारपूस केली असता त्यांचे नाव विचारले असता अक्षय पाटील, उज्वल पाटील, गणपत नन्नवरे, सोनू नन्नवरे ,विशाल सपकाळे, किरण राजपूत ,नाना पाटील ,अशी सांगितली. तेव्हा सदरील वाहनांवर कारवाई करण्यासाठी उपस्थित असलेले अधिकारी गेले असता त्यांच्याशी वाद घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तेव्हा तिथे उपस्थित असलेले अधिकारी यांनी महसूल विभागातील इतर अधिकारी व नायब तहसीलदार संदीप विजयसिंह मोरे, मंडळ अधिकारी अमोल पाटील , हेमंत कुमार महाजन, तलाठी ऋषिकेश सुरवसे, तलाठी विवेक बिनवडे, तलाठी विनोद पाटील धरणगाव, यांना फोनवरून घडलेल्या घटनेची माहिती सांगितली व त्यांना तिथे बोलावले असता. इतर आलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी तिथे उपस्थित असलेले ट्रॅक्टर चालक-मालक यांना ट्रॅक्टर महसूल विभागाला घेण्यात सांगितले असता त्यांनी काही एक न ऐकता अधिकाऱ्यांशी बाचाबाची केली तेव्हा अधिकाऱ्यांनी पाळधी पोलीस स्टेशनची संपर्क साधला असता पोलीस गाडी येत असल्याचे बघून ट्रॅक्टर तिथून बळजबरीने वेग वाढवून घेऊन गेले. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी सात जणांविरुद्ध पारधी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. पुढील तपास प्रवीण तांदळी हे करीत आहेत.

  • Related Posts

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटून भीषण अपघात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला…

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले. गावागावातून हिंदु राष्ट्राची मागणी!  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील आव्हाणी गावात हिंदुराष्ट्रआव्हानी नावाचे फलकाचे अनावरण शुभ हस्ते करण्यात आले. हिंदू…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द