पथदिव्यांच्या अंधारात मनसेचे, “मोबाईल लाईट आंदोलन…

पथदिव्यांच्या अंधारात मनसेचे, “मोबाईल लाईट आंदोलन”

जळगाव- मोहाडी परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिव्यांचा पूर्ण अंधार असल्यामुळे रुग्ण, विशेषतः गर्भवती माता आणि त्यांच्या नातेवाईकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या गंभीर दुर्लक्षा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी मोबाईलचा लाईट प्रज्वलित करून पथसंंचलन केले व शासनाच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध नोंदवला. “पथदिवे नसल्यानं रुग्णालयाच्या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन चालावे लागते, हे शासनाच्या विकासाच्या घोषणांना काळा फटका आहे,” असा रोष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले हे शासकीय रुग्णालय १०० खाटांचे असून प्रसूती विभागही येथे कार्यरत आहे. मात्र, इतक्या महत्त्वाच्या आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकही पथदिवा कार्यरत नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस रुग्ण व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

रुग्णालयाच्या रस्त्यावर दिव्यांचा अभाव हा प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आणि नियोजन शून्यतेचा स्पष्ट दाखला असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत रुग्णालय प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा मनसेकडून पुढील उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

“अंधारात प्रकाश दाखवणारे हे आंदोलन जनतेच्या डोळ्यांतील सत्य उजेडात आणणारे ठरले,” अशा शब्दांत नागरिकांनी मनसेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

मोहाडी रस्त्यावरील शासकीय रुग्णालय रस्त्यावर तातडीने पथदिवे बसवावेत. अन्यथा मनसेकडून अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.

या अनोख्या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे महानगर अध्यक्ष किरण तळेले, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे,ललित शर्मा,राजेंद्र निकम,प्रकाश जोशी,चेतन पवार, शेतकरी सेनचे अविनाश पाटील, राहुल चव्हाण, दीपक राठोड,ॲड सागर शिंपी,हर्षल वाणी, ऐश्वर्य श्रीरामे,विकास पाथरे, महिला सेनेच्या अनिता कापुरे,लक्ष्मी भील व पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.