फैजपुर येथे पुर्व नियोजित बैठक संपन्न…

फैजपुर प्रतिनिधि ; यावल तालुव्यातील फैजपुर येथे नुकतेच जळगाव जिल्ह्य वैदु समाजांच्या वतीने स्थानिक महिला कार्यकर्ता सौं. कांचन जगन असलकर यांच्या नेतृत्वात सामुहिक विवाह सोहळा बैठकी चे आयोजन करण्यातआले होते, दि २८ रोजी फैजपुर येथे खांडेराव वाडी येथे वैदु समाजांने बैठक घेऊन विवाह सोहळा निमित्त सखोल चर्चा केली व समाजात एक रुपयेत विवाहा लावावा साध्या पद्धतीने विवाह करणयाचे आवाहन या वेळी वैदु समाज बांधवानी केले, या प्रसंगी प्रमुख अतिथि पोलिस निरिक्षक दशरत हटकर, अखिल भारतीय वैदु समाजाचे अध्यक्ष राजु लोखंडे, नाशिक जिल्हा युवा कार्यध्यक्ष शशांक शिंदे, राज्य अध्यक्ष ,अनिल पवार आदि समाज बांधव मोठया संख्याने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सौ.कांचन जगन्नाथ असलकर यांनी केले. यावेळी सौ कांचन जगन्नाथ असलकर यांना अखिल महाराष्ट्र वैदू समाज विकास फाउंडेशन या संस्थेच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष पदी निवड करण्यात आले निवडीचे पत्र संघटनेचे मार्गदर्शक पीआय दशरथ हटकर, अध्यक्ष राजू लोखंडे यांच्या शुभहस्ते निवडीचे पत्र देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल गुमळकर (पोलीस हवालदार ) यांनी केले.जळगाव जिल्ह्य वैदु समाजांच्या.लोग सुरेश गुम्लाकर फैजपूर ,सुनील गुमलाकार, हिरालाल दुर्गादास गुम्लकर, जलगा अस्लकार रावेर, संजय अस्लकर तदवेल, भगवान वैदू, सुरेश शिवलकर, दीपक पवार , मोतीराम असलकार उपस्थित होते








