पिंप्राळा रणरागिणी’ महाराष्ट्रातील पहिली महिला ई-रिक्षा चालक..

पिंप्राळा रणरागिणी’ महाराष्ट्रातील पहिली महिला ई-रिक्षा चालक..

जळगाव : स्त्रीच्या जिद्दीसमोर संकटे कधीच थांबू शकत नाहीत, हे दाखवून दिलं आहे पिंप्राळा येथील सौ. अनिता ताई संजय भोई यांनी.

एकेकाळी लोटगाडीवर चणे, फुटाणे, चुरमुरे विकत गल्लीबोळात फिरणाऱ्या अनिताताईंनी संघर्षाच्या मार्गावरून स्वावलंबनाचा नवा अध्याय लिहिला. मराठी प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाने त्यांनी बँक कर्ज व शासकीय सबसिडीची प्रक्रिया पूर्ण करून स्वतःची इलेक्ट्रिक मालवाहू रिक्षा खरेदी केली. आज त्या आत्मविश्वासाने रिक्षा चालवतात, श्रम कमी झाले आहेत, ग्राहकवर्ग वाढला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला ई-रिक्षा चालक म्हणून गौरविल्या जात आहेत. या उल्लेखनीय कार्याबद्दल पिंप्राळा प्रतिष्ठानतर्फे त्यांना ‘पिंप्राळा रणरागिणी’ म्हणून सन्मानित करण्यात आले.

अनिता ताईंचा हा प्रवास केवळ एका स्त्रीचा विजय नाही तर हजारो महिलांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे. त्यांचा संदेश स्पष्ट आहे “लोटगाडी सोडा, ई-रिक्षा घ्या… महिला पण दोन पाऊल पुढे चालल्या आहेत. या प्रसंगी पिंप्राळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, प्रकाश बारी,सचिव अर्चना संदीप पाटील, विमलबाई अशोक पाटील, शारदा राकेश बडगुजर, सुरेखा प्रकाश पाटील, सपना सागर दांडगे, संगीता कैलास कोळी, संगीता रवींद्र धनगर, लिलाबाई पितांबर पाटील,हिराबाई भागवत चौधरी,अर्चना विलास पाटील, सविता विशाल पाटील, दिपाली विजय लंके, दिपाली राहुल पाटील, स्वाती विक्रम पाटील, वैशाली श्रीराम पाटील, विमलबाई गोपीचंद पवार, मेघा देविदास पाटील, छाया दीपक पाटील, चेतना परमेश्वर चिमणकारे, बेबाबाई गजमल पाटील, सुनिता माधवराव पाटील, भिकुबाई घनश्याम पाटील, मनीषा सचिन जयकर, अर्चना किशोर पाटील, रत्ना कोतवाल, प्रतिभा पाटील, सुनिता पाटील, द्रोपदाबाई भाऊराव निकम, उषाबाई देविदास पाटील, सुमन भगवान पाटील, सोनाली सचिन पाटील,संजय वाघ,ज्ञानेश्वर, कौस्तुभ पाटील, शैलेश राजपूत, विशाल पाटील, विजयसिंग पाटील उपस्थित होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.