अचानक स्फोटाने मिलन हॉटेल हादरले; आमदार किशोर पाटील घटनास्थळी.

अचानक स्फोटाने मिलन हॉटेल हादरले; आमदार किशोर पाटील घटनास्थळी.

भडगाव (वार्ताहर) – भडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या मिलन हॉटेलमध्ये आज दुपारी अचानक डी.फ्रिजचा भीषण स्फोट होऊन परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत हॉटेल चालकाचा मुलगा सोहिल मणियार, भडगाव शहरातील रवी सोनवणे तसेच पुणे येथील पाच ग्राहक गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटानंतर हॉटेलमध्ये आगीचा भडका उडाला असून तात्काळ नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना प्रथम उपचारासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सर्वांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी पाचोरा येथे हलविण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच आमदार किशोर पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. तसेच रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज जाधव यांना आवश्यक सूचना दिल्या. दरम्यान, जखमींच्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मदतकार्य हाती घेतले असून घटनास्थळी तातडीने बचाव कार्य सुरू आहे. या भीषण अपघातामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.