धरणगाव येथील तहसीलदार यांना शाब्बासकी, परंतु एरंडोल व जळगाव तहसीलदार यांना शाब्बासकी का नाही?

नुकतेच धरणगाव येथील तहसीलदार हे स्वतः पाण्यात उडी घेऊन वाळू माफिया यांना पकडण्यास उतरलेले आहेत. धरणगाव येथील तहसीलदार यांना शासनाचा महसूल वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावे लागतात परंतु तसेच एरंडोल व जळगाव येथील तहसीलदार यांना असे प्रयत्न करता येत नाहीत का असे पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.
एक दिवस अगोदर न्यूज पोर्टलला बातमी लावल्यानंतर एरंडोल येथील तहसीलदार यांनी फक्त एकच दिवसच कारवाई केली त्यानंतर जैसे तैसे सुरू आहे, त्यामुळे एरंडोल येथील तहसीलदार व जळगाव येथील तहसीलदार मॅडम यांच्यावर नागरिक नाराज असल्याचे दिसून येत आहे.
संबंधित जळगाव तहसीलदार यांना वारंवार सांगून सुद्धा धानोरा येथील व कढोली येथे बेसुमार वाळू उपसा सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी महसूल अधिकारी कोणतेही कारवाई करताना दिसत नाही आहे.
अशातच आज आमचे प्रतिनिधी कांताई बंधारा या डॅम वरून जात असताना समोरच ट्रॅक्टरच्या क्रेन च्या सहाय्याने वाळू उपसा सुरूच होता, दरम्यान संबंधित तहसीलदार यांना सांगितल्या नुसार सुद्धा तहसीलदार सांगतात की आमची कारवाई सुरू आहे.
वाळू उपसा कायमचा थांबायला काय करावे लागेल असे नागरिकांना पडलेला प्रश्न.









