लेवा एज्युकेशन युनियन संचलित श्रीमती शांताबाई लक्ष्मणराव खडके प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे आज विद्यार्थिनींचा शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला .विद्यार्थिनींच्या प्रवेशसाठी बलून ची कमान तसेच बलून चे शोभिवंत असे पिलर लावण्यात आले होते. विद्यार्थिनींना पाटी बिस्कीटचा पुडा व गुलाब पुष्प देऊन तसेच औक्षण करून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अंजना सुरवाडे मॅडम यांनी विद्यार्थिनींचे स्वागत केले. विद्यार्थिनींना आवड निर्माण व्हावी म्हणून पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहार अंतर्गत योजनेतून विद्यार्थिनींना शिरा वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ स्वाती फिरके मॅडम तसेच पालक प्रतिनिधी व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती इरावती अहिरे मॅडम यांनी केले तर पाठ्यपुस्तक वितरणाचे सूत्र संचालन श्री उमेश्वर सूर्यवंशी सर यांनी केले.








