शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा – २०२५.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करीता
शिक्षक अभियोग्यता व बुब्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे.परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तेव्हा इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन आयुक्ता अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.









