क्रिकेट स्पर्धेसाठी मैदानावर पाणी मारले, घरी परतत असताना अचानक टॅक्टर पुढे सरकला अन्…

मार्केट कमिटी मैदानावर क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे. क्रिक्रेट खेळताना माती उडू नये यासाठी तरुणाने टँकरने मैदानावर पाणी मारले.पाणी मारून झाल्यावर टँकर उभा केला मात्र विचित्र अपघात घडला त्यात तरुणाचा मृत्यू झाला.छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार येथील तरुण ट्रॅक्टरच्या टायरखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. गुरुवारी रात्री आठला महाराष्ट्र बँकेजवळ घडली. नितीन पांडुरंग सदावर्ते (वय ४७) असे मृताचे नाव आहे.वडोद बाजार येथे मार्केट कमिटी मैदानावर क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे. क्रिक्रेट खेळताना माती उडू नये यासाठी सदावर्ते यांनी टँकरने मैदानावर पाणी मारले.पाणी मारून सदावर्ते टँकर घेऊन परत जात असताना महाराष्ट्र बँकेसमोर जागेवर ट्रॅक्टर त्यांनी ढाळी जागेवर उभे केले. अचानक ट्रॅक्टर पुढे सरकले. ते थांबविण्यासाठी त्यांनी हाताने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते थांबले नाही.

यावेळी त्यांचा ट्रॅक्टरच्या टायरखाली येऊन मृत्यू झाला. या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच येथील युवकांनी त्यांना फुलंब्री येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता वडोद बाजार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.सरस्वती भुवन शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग सदावर्ते यांचे ते पुत्र होत. ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते. आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांनी त्यांच्या अपघाती निधनाबद्दल दुःख व्यक्त करीत कुटुंबीयांची भेट घेतली.घटनेची वडोद बाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वडोदबाजार पोलिस तपास करीत आहेत.

लग्नासाठी अजिंठा गावाकडे जात असताना महिलेने बाळापूर फाट्यावर एका अज्ञात दुचाकीस्वाराला हात दाखवून थांबवले. मात्र बाळापूर गावाजवळ दुचाकीवरुन पडल्याने या महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी 8.30 च्या दरम्यान ही घटना घडली. महिलेच्या मृत्यूनंतर हा दुचाकीस्वार पसार झाला. संगीता सुभाष पांडे (वय 40) असे महिलेचे नाव आहे. घटनास्थळी असलेल्या हॉटेल प्रेम सागर येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली. मात्र वाहनाचा नंबर आणि चालकाचा चेहरा व्यवस्थित दिसत नसल्याने त्यासंबंधी ओळख पटू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. या घटनेचा पोलिस तपास करत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.