राज्यात धरणांमध्ये केवळ ३७ टक्के पाणीसाठा; पुण्यात सर्वात कमी तर सर्वाधिक पाणी विदर्भातील शहरात.

राज्यातील धरणांमध्ये ३७ टक्के पाणीसाठी असून सर्वात कमी पुण्यात आहे. तर सर्वाधिक पाणीसाठी अमरावती शहरात आहे.राज्यातील तापमान वाढत असताना धरणांमधील पाणीसाठाही कमी झाला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी राज्यातील सर्व प्रमुख धरणांत सरासरी ३७.२६ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा समाधानकारक असला तरी उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे.पुण्यातील एकूण ३५ प्रमुख धरणांमध्ये एकूण ३१.११ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी राज्यातील प्रमुख धरणांमध्ये याच कालावधीत ३०.६२ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला होता. तसेच या शिल्लक पाणीसाठ्यापैकी केवळ १०८२९.१० द.ल.घ.मी. इतकाच उपयुक्त पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने सोमवारी राज्यातील प्रमुख १३८ धरणांमधील पाणीसाठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे.

यानुसार राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये सोमवारपर्यंत ३७.२६ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. यात सर्वाधिक पाणीसाठा हा अमरावती जिल्ह्यात असून अमरावीतील एकूण १० धरणांमध्ये ४४.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षी हा आकडा ४१ टक्क्यांवर होता.अमरावतीपाठोपाठ नाशिक येथील सर्व प्रमुख २२ धरणांमध्ये ४३.९४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती या अहवालाच्या माध्यमातून समोर आली आहे. तर, कोकणातील धरणांत ४०.४५ टक्के, छत्रपती संभाजीनगर येथील धरणांत ४२.६९ टक्के, नागपूर येथील धरणांत ३८.०० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

जिल्हानिहाय आकडेवारीवर नजर टाकली असता सर्वात कमी पाणसाठी पुण्यातील धरणांत नोंदविण्यात आला आहे. पुण्यातील एकूण ३५ प्रमुख धरणांमध्ये एकूण ३१.११ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्यातील या शिल्लक पाणीसाठ्यांमध्ये एकूण ६७५१.७१ द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक आहे.याशिवाय, राज्यातील मध्यम प्रकल्पातील धरणांत ४७.५५ टक्के, लघु प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरणांमध्ये ३६.७७ टक्के आणि महाराष्ट्र राज्य प्रकल्पामध्ये एकूण ३८.५८ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.