‘कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो, घरातील बाथरूममध्ये…’; संतोष देशमुखांच्या घरी आलेल्या अज्ञात महिलेचा खळबळजनक दावा.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. एका अज्ञात महिलेने कृष्णा आंधळे आपल्यासोबत राहत असल्याचा दावा केला आहे. तिने देशमुखांच्या घरातील बाथरूममध्ये अंघोळ करण्याचा हट्ट धरला. या महिलेने आंधळेचे पुरावे असल्याचंही सांगितलं. पोलिसांनी महिलेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. देशमुख यांच्या हत्येतील आरोपी अद्याप फरार आहे, तिला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या यांच्या हत्येला आता जवळपास पाच महिने होतील. ९ डिसेंबर २०२४ ला अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि हत्येतील आरोपी गजाआड आहेत. मात्र कृष्णा आंधळे हा अद्याप फरार असून त्याचा तपास पोलिसांना लागलेला नाही. अशातच संतोष देशमुख यांच्या घरी एका अज्ञात महिलने आंधळे आपल्या सोबत राहत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

इतकंच नाहीतर तिने देशमुखांच्या घरातील बाथरूममध्ये अंघोळ करण्यासाठी हट्ट धरला होता. नेमकी कोणी होती संबंधित महिला जाणून घ्यामस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला कृष्णा आंधळेचे माझ्याकडे पुरावे आहेत म्हणत ठाण मांडून बसली. सदरील अज्ञात महिला शनिवारी सायंकाळी ६ वाजता देशमुख कुटुंबीयांच्या घरासमोरील पॅन्डॉलमध्ये दाखल झाली. कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा सुरूवातीला तिने केला. मात्र पोलिस आल्यानंतर तीने नाव सांगण्यास देखील नकार दिला. तीने देशमुखांच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी द्यावं अशीही मागणी केली. दुसऱ्या बाथरूमची सोय करून दिल्यानंतरही देशमुखांच्या घरातीलच बाथरूममध्ये आपल्याला अंघोळ करायची आहे असा तिचा हट्ट होता.

यानंतर ती देशमुखांचा घराच्या परिसरात बसुन राहिली. रात्रभर पॅंडॉलमध्ये झोपली अखेर सकाळी केज पोलीस आल्यानंतर बसमध्ये बसुन निघुन गेली. संबंधित महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून तीची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली आहे.दरम्यान, संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता आणि देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करत होता. कारण देशमुखांना मारताना नराधमांनी व्हिडीओ शुट केले होते. तर सेल्फीही काढले होते. या प्रकरणातील आता सर्व आरोपी गजाआड असले तरी त्यांना शिक्षा झालेली नाही. यामधील आंधळे याला पकडण्यात पोलिसांना आणखीन यश आलेले नाही.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.