‘राज ठाकरे तेव्हाच शिवसेना अध्यक्ष झाले असते, तर….’ शिंदेंच्या शिलेदाराचा सनसनाटी दावा.

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक वेळेला हात मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी कधीही ‘हो’ म्हटले नाही, असाही टोला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे त्यावेळेला माझ्याकडे असं म्हटले होते ‘एक म्यान मे दो तलवार नही रहती है’ मला अजून आठवतंय हे वाक्य. असाही गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना रामदास कदम यांनी राज- उद्धव यांच्या एकत्र येण्यावरती मत व्यक्त केलं आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर आता महायुतीकडून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम यांनीही मोठी प्रतिक्रिया दिली असून “हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत असं मला पूर्वीही वाटत होतं आणि आताही वाटत आहे” असं सांगत “राज ठाकरे जर का शिवसेनेचे अध्यक्ष असते तर शिवसेना फुटली नसती” असेही मोठे विधान रामदास भाई कदम यांनी केलं आहे.

ते पुढे म्हणाले की हे दोघेही एकाच व्यासपीठावरती एकाच ठिकाणी येणार असतील तर निश्चितपणे त्या ठिकाणी मराठी माणसाचे हित आहे. हे दोघेही एकत्र आले पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत कालही होतं आणि आजही आहे. खरंतर मी आणि बाळा नांदगावकर आम्ही दोघांनीही यासाठी खूप प्रयत्न केले होते. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक वेळेला हात मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी कधीही ‘हो’ म्हटले नाही, असाही टोला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे त्यावेळेला माझ्याकडे असं म्हटले होते ‘एक म्यान मे दो तलवार नही रहती है’ मला अजून आठवतंय हे वाक्य. असाही गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना रामदास कदम यांनी राज- उद्धव यांच्या एकत्र येण्यावरती मत व्यक्त केलं आहे.राज ठाकरे यांची त्यावेळेला फक्त एकच मागणी होती की, पुणे आणि नाशिक हे फक्त दोन जिल्हे माझ्याकडे द्या बाकी उद्धव यांनी सगळं सांभाळावं.

अशी राज ठाकरेंची भूमिका होती. पण उद्धव ठाकरे नही बोलले. आता वेळ अशी आली आहे की उद्धव ठाकरे यांच्या हातून सगळंच गेलं आहे. आकाश फाटलय, ठिगळ लावणार तरी कुठे? मग राज ठाकरे जर का सोबत येत असतील तर त्यांचा आधार घेऊन थोडसं आपल्याला राजकारणात डोकं वर काढता येईल का? हा प्रयत्न उद्धव यांचा असावा असाही आरोप रामदास कदम यांनी केला आहे.आपण त्या दोघांनाही जवळून पाहिलं आहे. राज ठाकरे हे स्पष्ट बोलणारे आहेत. ते ओपन हार्ट आहेत. पण उद्धव ठाकरे हा आतल्या गाठीचा माणूस आहे ते राज ठाकरे यांना कधीच पुढे येऊ देणार नाहीत. आणि आता अटीशर्ती घालायचा प्रश्न येतो कुठे तुम्ही दोघे भाऊ आहात ना? असेही उद्धव यांना रामदास कदम यांनी सुनावलं आहे.खरंतर त्यावेळेला आमच्याकडून एक चूक झाली मी आता अधिक स्पष्ट बोलणार नाही महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना पक्षाचे अध्यक्षपद गेले, त्याच वेळेला राज ठाकरे यांना अध्यक्ष करायला हवं होतं. ती त्यावेळी शिवसेनेकडून झालेली मोठी चूक आहे अशीही कबुली कदम यांनी दिली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.