जरा जपून.., भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील; योगेश कदम यांचा राज ठाकरेंना ‘आपुलकीचा सल्ला’.

शिवसेनेचे येथे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली असतानाच आता रामदास कदम यांचे सुपुत्र शिवसेनेचे युवा नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही एक फेसबुक पोस्ट करत राज साहेबांना आपुलकीचा सल्ला दिला आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येतील किंवा कसे याकडे राज्याचे लक्ष लागला आहे. या विषयावर शिवसेनेचे येथे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली असतानाच आता रामदास कदम यांचे सुपुत्र शिवसेनेचे युवा नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही एक फेसबुक पोस्ट करत राज साहेबांना आपुलकीचा सल्ला दिला आहे. सन्माननीय राजसाहेबांना एक आपुलकीचा सल्ला असं म्हणत उबाठा गटाच्या प्रमुखांची निती ही ‘वापरा आणि फेकून द्या’ ही राहिलेली आहे. त्यामुळे राजसाहेब आपल्याला आपुलकीचा सल्ला देतो जरा जपून, आपण मनापासून हात पूढे कराल आणि भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत योगेश कदम यांनी राज ठाकरे यांना आपुलकीचा सल्ला दिला आहे.

योगेश कदम यांनी यामध्ये पुढे म्हटले आहे की, स्वत:चा स्वार्थ साधून झाला की उद्धव ठाकरे यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात आणि याचा प्रत्यय खुद्द सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना देखील आहे. याशिवाय शिवसेनेचे पहिल्या फळीतले नेते माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायणजी राणे, स्वर्गीय माजी मुख्यमंत्री मनोहरजी जोशी,  दिवाकरजी रावते,  लीलाधरजी डाके,  रामदासभाई कदम आणि एकनाथजी शिंदे यांना सुद्धा गरज सरो नी वैद्य मरो प्रमाणे कसे डावलले हे वेगळ्याने सांगायला नको असाही राज ठाकरेंसाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये सांगत योगेश कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. योगेश कदम यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे एकत्र येण्याच्या सुरू असलेल्या चर्चांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे त्या वेळेला अध्यक्ष झाले असते तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते शिवसेना फुटली नसती राज ठाकरे यांच्याकडे माणसं ओळखण्याची किमया त्यांच्याकडे आहे ते पण वाघासारखे माणूस आहेत त्यांना वाघासारखी माणसं लागतात आणि उद्धव ठाकरे यांना सुभाष देसाई यांच्यासारखी माणसं लागतात शेळ्या मेंढ्या .अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.उद्धव यांच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी असेल तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर येणार नाहीत ते स्वाभिमानी आहेत शिवसेनाप्रमुखांच्या विचाराला काळीमा फासण्याचे काम ते कधीही करणार नाहीत थोडक्यात सांगायचं तर राज ठाकरे यांच्यामध्ये महाराष्ट्र बाळासाहेबांना पाहतो आहे. आणि राज ठाकरे यांनी आजच नाही तर मलाही एकदा सांगितलं होतं बघा उद्धव यांना विचारून माझी तयारी आहे पण म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरेच तयार नव्हते असाही गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.