PSI रणजीत कासलेची पोलीस दलातून हकालपट्टी, पुण्यातील हॉटेलमधून ताब्यात घेताच कारवाई.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले, ‘कराड एन्काऊंटर’च्या ऑफरच्या दाव्याने चर्चेत आले. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ते गंभीर आरोप करताना दिसले. परवानगीशिवाय परराज्यात जाऊन आरोपींकडून पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप होता आणि त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. आता त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आलीये.कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला होती, असा दावा करणारे बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले हे मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सोशल मीडियावर ते व्हिडीओ टाकून गंभीर आरोप करत होते. रणजीत कासले बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ते परवानगीशिवाय परराज्यात गेले होते. परराज्यात त्यांनी आरोपींकडून पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले.

आता मोठी कारवाई त्यांच्यावर करण्यात आली असून रणजीत कासलेंची पोलिस दलातून थेट हकालपट्टी करण्यात आलीये.संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांनी रणजीत कासलेंना बडतर्फ केले आहे. कासले यांच्यावरती बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकात ॲट्रॉसिटीचा आहे गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने कासले यांना बडतर्फ करण्यात आलंय. पोलिस अधीक्षकांनी निलंबित केल्यापासून धक्कादायक खुलासे कासले यांच्याकडून केली जात होती. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना कासले दरवेळी वेगळ्या ठिकाणाहून व्हिडीओ शूट करताना दिसले. हेच नाही तर थेट दिल्लीतील पबमधील डान्सचा व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर आपण पुणे पोलिसांना किंवा बीड पोलिसांना आत्मसमर्पण करणार असल्याचे त्यांनी म्हटले.निलंबित पीएसआय रणजीत कासले हे काल पुणे विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासह विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये मोठा घोटाळा झाल्याचा दावा देखील केला.

रणजीत कासले यांनी आत्मसमर्पण करण्याच्या अगोदरच बीड पोलिसांनी रणजीत कासलेला ताब्यात घेतले. पुण्यातील स्वारगेट परिसरात असलेल्या एका हॉटेलमधून रणजीत कासले याला ताब्यात घेण्यात आले.रणजीत कासले यांना पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतले. यानंतर बीडच्या दिशेने कासलेंना पोलिस घेऊन गेल्याचीही माहिती मिळतंय. पुणे पोलिसांकडे सरेंडर होणार असे कासले यांनी अगोदरच सांगितले होते. मात्र, त्यापूर्वीच बीड पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळीचे काही सीसीटीव्ही फुटेज देखील आता व्हायरल होताना दिसत आहेत. बोगस एन्काउंटर नेमके काय असते, हे सांगताना रणजीत कासले हे काल दिसले होते. रणजीत कासले याच्यावर कडक कारवाई करत थेट आता त्यांची पोलिस दलातून हकालपट्टी करण्यात आलीये.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.