खळबळजनक : पीएसआयच निघाला चोर ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना सातत्याने घडत असतांना आता चोरीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या जालन्याचा पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मांटे यांच्यासह चार जणांना चोपडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चौघाना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा बस स्थानकाच्या परिसरात चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना १६ रोजी मिळाली होती.

त्यावरून चोपडा शहर पोलीस व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मांटे (वय ५७, सदर बाजार, जालना), श्रीकांत भिमराव बघे (२७, रा. गोपाल नगर, खामगाव), अंबादास सुखदेव साळोकार (४३, रा. माना, ता. मूर्तिजापुर, जि. अकोला,) व रउफ अहमद शेख (४८, रा. महाळस, ता.जि. बीड) या चौघांना चोरीच्या गुन्हात अटक केली होती. यानंतर त्यांना आज चोपडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चौघांना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करत आहेत.

सिल्लोड, शिरपूर, चोपडा, एरंडोल याठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये ही पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मांटे यांच्या टोळीचा सक्रिय सहभाग असून अजून कुठल्या ठिकाणी या टोळीचा सहभाग आहे, याचा चोपडा पोलीस तपास करत आहेत. चोपडा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अंबादास सुखदेव साळोकार याच्यावर विविध ठिकाणी २७पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. यात जालना येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर अंबादास हा जालन्यातील सदर बाजार जेलमध्ये असताना प्रल्हाद मांटे यांच्याशी संपर्कात आला. तेथून अंबादास साळगावकर आणि प्रल्हाद मांटे हे वर्षभरापासून सोबत चोऱ्या करत असल्याची माहिती मिळाली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.