बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा येथे भीषण अपघात झाला असून आंध्र प्रदेशातील भाविकांच्या बसची उभ्या ट्रकला धडक बसली. या दुर्घटनेत ३५ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना मलकापूर आणि बुलढाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरू असून यापूर्वी झालेल्या अपघातांमध्ये अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एक मोठी अपघाताची घटना घडलीये. आंध्रप्रदेशच्या भाविकांची बस उभ्या ट्रकवर धडकली आणि ३५ जण जखमी झाले आहेत. ही घटना नांदुरा दरम्यानच्या काटी फाट्याजवळ घडली. बुलढाणा जिल्ह्यात मुख्यतः घाटाखाली मागील दोन आठवड्यामध्ये तीन भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातांमध्ये जवळपास आठ ते दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच रात्री मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला. ज्यामध्ये जवळपास ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, सुदैवाने यात जीवितहाणी झाली नाहीये.










