
पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी येथे ४ एप्रिलच्या रात्री दुचाकीवरून जाणाऱ्या स्वप्नील भाबुदे याला धक्का लागल्याचे कारण पुढे करून दोघांनी थांबवलेपूर्व द्रुतगती महामार्गावर रात्रीच्या वेळेस एका दुचाकीस्वाराला अडवून, त्याला धमकावून दोघांनी दुचाकी आणि मोबाइल पळवला, महामार्गावर अशी लूट होत असल्याने विक्रोळी पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र काहीच धागादोरा मिळत नव्हता. रात्रीची वेळ असल्याने सीसीटीव्हीतही काही स्पष्ट दिसेना. तपासादरम्यान महापालिकेची कचरा गाडी येथून गेल्याचे समजले. या गाडीला पुढे असलेल्या कॅमेऱ्यात रात्रीच्या वेळेस लूटमार करणारे दोघे कैद झाल्याचे दिसले. यातून पोलिसांना तपासाची दिशा मिळाली आणि ठाणे येथून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी येथे ४ एप्रिलच्या रात्री दुचाकीवरून जाणाऱ्या स्वप्नील भाबुदे याला धक्का लागल्याचे कारण पुढे करून दोघांनी थांबवले. त्याला धमकी देऊन आणि मारहाण करत दुचाकी आणि त्याच्याकडील मोबाइल हिसकावून घेतला. त्यामुळे धक्का बसलेल्या स्वप्नील याने दुसऱ्या दिवशी विक्रोळी पोलिस ताण्यात तक्रार केली.महामार्गावर अशा घटना घडत असल्याने याची गंभीर दखल घेऊन अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त विजय सागर आणि वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गिरीश गायकवाड, उपनिरीक्षक पंकज पाटील यांच्या पथकाने लूटमार करणाऱ्यांचा शोध सुरू केला.घडलेल्या प्रकाराने गोंधळल्याने स्वप्नील याला आरोपींची शरीरयष्टी व कपड्याबाबत काहीही सांगता येत नव्हते.