मुंबईत रात्री बाईकस्वाराची लूट, कॅमेरे तपासले, क्ल्यू मिळेना; अखेर कचरा गाडीने गेम फिरवला.

पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी येथे ४ एप्रिलच्या रात्री दुचाकीवरून जाणाऱ्या स्वप्नील भाबुदे याला धक्का लागल्याचे कारण पुढे करून दोघांनी थांबवलेपूर्व द्रुतगती महामार्गावर रात्रीच्या वेळेस एका दुचाकीस्वाराला अडवून, त्याला धमकावून दोघांनी दुचाकी आणि मोबाइल पळवला, महामार्गावर अशी लूट होत असल्याने विक्रोळी पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र काहीच धागादोरा मिळत नव्हता. रात्रीची वेळ असल्याने सीसीटीव्हीतही काही स्पष्ट दिसेना. तपासादरम्यान महापालिकेची कचरा गाडी येथून गेल्याचे समजले. या गाडीला पुढे असलेल्या कॅमेऱ्यात रात्रीच्या वेळेस लूटमार करणारे दोघे कैद झाल्याचे दिसले. यातून पोलिसांना तपासाची दिशा मिळाली आणि ठाणे येथून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

पूर्व द्रुतगती महामार्गावर विक्रोळी येथे ४ एप्रिलच्या रात्री दुचाकीवरून जाणाऱ्या स्वप्नील भाबुदे याला धक्का लागल्याचे कारण पुढे करून दोघांनी थांबवले. त्याला धमकी देऊन आणि मारहाण करत दुचाकी आणि त्याच्याकडील मोबाइल हिसकावून घेतला. त्यामुळे धक्का बसलेल्या स्वप्नील याने दुसऱ्या दिवशी विक्रोळी पोलिस ताण्यात तक्रार केली.महामार्गावर अशा घटना घडत असल्याने याची गंभीर दखल घेऊन अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त विजय सागर आणि वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गिरीश गायकवाड, उपनिरीक्षक पंकज पाटील यांच्या पथकाने लूटमार करणाऱ्यांचा शोध सुरू केला.घडलेल्या प्रकाराने गोंधळल्याने स्वप्नील याला आरोपींची शरीरयष्टी व कपड्याबाबत काहीही सांगता येत नव्हते.

त्यानंतर घटनास्थळापासून ऐरोली पुलापर्यंतचे कॅमेरे तपासले, परंतु रात्रीची वेळ असल्याने कॅमेऱ्यामध्ये दुचाकी ओळखणे शक्य झाले नाही. ऐरोली व मुलुंड टोलनाक्यावरील कॅमेरे तपासले, परंतु त्यातही काहीच माहिती मिळाली नाहीपोलिसांनी तपास कौशल्य पणाला लावून वारंवार स्वप्नीलकडून माहिती जाणून घेतली. घटनेच्या वेळी बाजूने रस्त्यावरील कचरा साफ करणारी गाडी, छोटा टेम्पो, ट्रक व काही गाड्या गेल्याचे स्वप्नील सांगत होता. त्यानुसार, टोलनाक्यावरील फुटेजमधून कचरा साफ करणाऱ्या गाडीचा क्रमांक मिळाला. या गाडीचा चालक आणि दोन कामगार यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी कचरा गाडीला कॅमेरा असल्याचे सांगितले. कचरा साफ करणाऱ्या गाडीवरील कॅमेऱ्यात मारहाण करणारे दोघे आणि त्यांच्याकडील दुचाकी दिसली. यावरून पोलिसांना तपासाची दिशा मिळाली.

  • Related Posts

    सौ. ज. ग. पुर्णपात्री ज्यु. कॉलेजमध्ये श्रावणी निलेश पाटील हिला द्वितीय क्रमांक.

    भडगाव येथील प्रतिष्ठित सौ. जयश्री गणेश पुर्णपात्री ज्युनिअर कॉलेजमध्ये झालेल्या HSC बोर्ड वार्षिक परीक्षेमध्ये श्रावणी निलेश पाटील हिने ८६.१७% गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. याआधी, २०२३…

    राफेलची ‘लिंबू-मिरची’ कधी काढणार? काँग्रेस नेते अजय राय यांच्या टिप्पणीनंतर वाद.

    राय यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, वाद निर्माण झाल्यानंतरही राय त्यांच्या विधानांवर ठाम राहिले.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सौ. ज. ग. पुर्णपात्री ज्यु. कॉलेजमध्ये श्रावणी निलेश पाटील हिला द्वितीय क्रमांक.

    सौ. ज. ग. पुर्णपात्री ज्यु. कॉलेजमध्ये श्रावणी निलेश पाटील हिला द्वितीय क्रमांक.

    राफेलची ‘लिंबू-मिरची’ कधी काढणार? काँग्रेस नेते अजय राय यांच्या टिप्पणीनंतर वाद.

    राफेलची ‘लिंबू-मिरची’ कधी काढणार? काँग्रेस नेते अजय राय यांच्या टिप्पणीनंतर वाद.

    पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनीच द्यावी ‘ऑफर’, अन्यथा १५ दिवसांनी…, महसूलमंत्री नेमकं काय म्हणाले?

    पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनीच द्यावी ‘ऑफर’, अन्यथा १५ दिवसांनी…, महसूलमंत्री नेमकं काय म्हणाले?

    भटक्या कुत्र्याचा ७ वर्षीय मुलीला चावा; प्रतिबंधक लस घेऊनही रेबीजने मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं हे कारण.

    भटक्या कुत्र्याचा ७ वर्षीय मुलीला चावा; प्रतिबंधक लस घेऊनही रेबीजने मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं हे कारण.