माळशेवगा येथे कीटकजन्य व जलजन्य आजाराबाबत जनजागृती व सर्व्हेक्षण
माळशेवगा.ता. चाळीसगाव.प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव अंतर्गत उपकेंद्र माळशेवगा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर. जिल्हा साथरोग अधिकारी वाबळे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत पाटील जिल्हा मलेरिया अधिकारी तुषार देशमुख शिरसगाव वैद्यकीय अधिकारी सुजित भोसले रोशन गायकवाड आरोग्य सहाय्यक सुरेंद्र शितोळे हेमंत कुलकर्णी तसेच मलेरिया सुपर वायझर किरण बेलदार यांचा मार्गदर्शनाने माळशेवगा येथे पावसाळ्याचे दिवस म्हणून विशेष खबरदारी म्हणून जलद ताप सर्व्हे कंटेनर सर्व्ह व्हाल गळती पाईप गळती गप्पी मासे सोडणे व गावात म्हणी टाकणे तसेच जल जन्य व कीटकजन्य आजाराबाबत माहिती पत्रिका वाटणे. गावात कोरडा दिवस पाडण्यासाठी सूचित करणे जिल्हा परिषद शाळा मध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा व डेंगू मलेरिया बाबत गीत गायन स्पर्धा राबून गट चर्चा घेऊन आजाराबाबत माहिती देणे. व लोकांना मार्गदर्शन करणे याकामी आरोग्यसेवक गुरूदास पाटील आरोग्यसेविका सुरेखा देशमुख समुदाय आरोग्य अधिकारी भाग्यश्री राठोड व गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका परिश्रम घेत आहेत.