डॉ.अनुज पाटील यांचे कुटुंब प्रचार मैदानात सक्रिय.. अनुज पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जळगाव शहरातील उमेदवार असून त्यांच्या उमेदवारीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.अनुज पाटील यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या प्रचार मोहिमेत सक्रीय सहभागी झालेले आहे, आणि ते जळगाव शहरातील विविध विभागांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.
अनुज पाटील यांच्या प्रचार मोहिमेत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी जणू काही प्रचाराचेच नेतृत्व घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्या पत्नी, मुले, आणि अन्य नातेवाईक मतदारांशी संवाद साधत मनसेच्या धोरणांचे समर्थन करत आहेत. विविध कार्यक्रम, सभा, रॅली आणि घर भेटी यांचे आयोजन करून अनुज पाटील यांच्या विजयासाठी आवाहन करण्यात येत आहे.