२५ मीटर मागे धावून पकडला बॉल, आयपीएलमधील सर्वात जास्त ट्रोल झालेल्या खेळाडूचा कॅच पहाच..

आयपीएल २०२५ मध्ये राहुल त्रिपाठी सोशल मीडियावर ट्रोल होत असतानाच आता त्याचे क्षेत्ररक्षणासाठी जोरदार काैतुक केले जात आहे.फलंदाजीत अपयशी ठरत असला तरी, क्षेत्ररक्षणात त्याने कमाल दाखवली आहे. त्याचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.आयपीएल २०२५ मध्ये सोशल मीडियावर सर्वाधिक कोणाला ट्रोल केले जात असेल तर तो राहुल त्रिपाठी आहे. राहुल त्रिपाठी हा भारतीय संघाकडून खेळलेला आहे. मात्र, त्याला आपल्या फलंदाजीतून धमाका करण्यात अजून यश मिळाले नाहीये. त्याला सोशल मीडियावरही ट्रोल केले जातंय. फलंदाजीच्या वेळी तो आपल्या दोन्ही खांद्यासोबतच पोट खूप जास्त हलवतो. यामुळेच सोशल मीडियावर त्याच्या व्हिडीओंना ट्रोल केले जाते आणि त्याची खिल्ली उडवली जाते.आपल्या फलंदाजीमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असलेला राहुल त्रिपाठी याचा असा सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्याचे काैतुक केले जातंय.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर प्रत्येकजण त्याचे काैतुक करताना दिसत आहे. राहुल त्रिपाठीने क्षेत्ररक्षणात चेन्नई विरूद्ध लखनऊ सुपर किंग्ज सामन्यादरम्यान मोठा चमत्कार केला केला. ज्याचाच व्हिडीओ हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.लखनऊच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर चेन्नई विरूद्ध लखनऊ सुपर किंग्जमध्ये सामना सुरू होता. पहिल्याच षटकात खलील अहमदचा बॉल एडेन मार्करमने लेग साईडवर खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल बॅटला लागून ऑफ साईडवर गेला. राहुल त्रिपाठी हा कव्हर पॉइंटवर सर्कलच्या आत क्षेत्ररक्षण करत होता. बॉल त्याच्या खूप जास्त मागे होता. तो विरुद्ध दिशेने धावू लागला.

त्याने दोन्ही हातांनी कॅच घेतला. विशेष म्हणजे राहुल त्रिपाठीला हा कॅच घेण्यासाठी २५ मीटर मागे धावावे लागले.राहुल त्रिपाठीच्या कॅचची सर्वात खास बाब म्हणजे इतके मागे धावून सुद्धा त्याचा तोल अजिबात गेला नाही. यादरम्यान त्याची संपूर्ण नजर ही बॉलवर होती. या कॅचनंतर लोक राहुलचे काैतुक करताना दिसत आहेत. अनेकांचे म्हणणे होते की, ही कॅच पकडणे कोणत्याही खेळाडूसाठी सोप्पे नव्हते. राहुल त्रिपाठीचा आयपीएलमधील हा १०० वा सामना आहे. फलंदाजीमध्ये जरी त्याला धमाका करण्यात यश मिळत नसले तरीही तो क्षेत्ररक्षण चांगले करतोय. त्याचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

  • Related Posts

    जळगावातील रिक्षाचालकाच्या घरावर तिघांनी केला गोळीबार.

    जुन्या वादातून मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनी भागात राहणाऱ्या २६ वर्षीय रिक्षाचालकाच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना २४ एप्रिलच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने गोळी लोखंडी गेटवर आदळून तिचे तुकडे झाले.…

    पुण्यात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू, महिला संतापल्या आणि…

    पुण्यात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याने संतप्त महिलांनी ताडी केंद्रावर तोडफोड केली. या घटनेने गावात तणाव निर्माण झाला असून, महिलांनी अवैध ताडी विक्री बंद करण्याची मागणी केली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावातील रिक्षाचालकाच्या घरावर तिघांनी केला गोळीबार.

    जळगावातील रिक्षाचालकाच्या घरावर तिघांनी केला गोळीबार.

    पुण्यात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू, महिला संतापल्या आणि…

    पुण्यात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू, महिला संतापल्या आणि…

    वाल्मिक कराडला जेलमध्ये पॅनिक अटॅक, प्रकृती बिघडली, डॉक्टरांकडून तपासणी .

    वाल्मिक कराडला जेलमध्ये पॅनिक अटॅक, प्रकृती बिघडली, डॉक्टरांकडून तपासणी .

    मुख्यमंत्रिपदावरुन चिमटे! बावनकुळेंच्या विधानानंतर भाजप-शिवसेनेची परस्परांना उद्देशून टोलेबाजी.

    मुख्यमंत्रिपदावरुन चिमटे! बावनकुळेंच्या विधानानंतर भाजप-शिवसेनेची परस्परांना उद्देशून टोलेबाजी.