
गडचांदूरच्या तहसीलदाराला पत्नीने केलेल्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अविनाश शेंबटवाड यांच्यावर पत्नीला पिस्तूल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांना नांदेडमधील त्यांच्या निवासस्थानी अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.पत्नीचा छळ करून तिच्यावर पिस्तूल रोखून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील एका तहसीलदाराला शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाने रविवारी त्यांची पोलिस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकारानंतर मोठी खळबळ निर्माण झालीये.गडचिरोली येथे कार्यरत असलेले अविनाश शेंबटवाड यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता.
सुरुवातीचा काही काळ सुखी संसार झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये वेगवेगळ्या कारणावरून वाद निर्माण झाले. याच वादातून जानेवारी महिन्यात संबंधित तहसीलदाराच्या पत्नीने महिला पोलिस दलातील कक्षात तक्रार नोंदवली. त्यानंतर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोघांमध्ये समिट घडविण्याचे अनेकदा प्रयत्न केले. पण, त्यानंतर याप्रकरणी पत्नीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.पोलिसांनी तहसीलदार व त्याच्या अन्य पाच नातेवाइकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. शनिवारी रात्री शेंबटवाड नांदेड येथील निवासस्थानी आले असताना, शिवाजीनगर पोलिसांचा फौजफाटा त्यांच्या घरी धडकला.
कोणताही विरोध न करता, वाद न घालता ते स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाले. रविवारी त्यांना न्यायालयापुढे उभे केले असताना दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला.आरोपीकडून रिव्हॉल्वर जप्त करायची आहे, अन्य आरोपींना पकडायचे आहे, असे अनेक कारणे सांगत सरकार पक्षातर्फे त्यांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली, पण तहसिलदारांकडून विधिज्ञ अरिफोद्दीन यांनी त्याला जोरदार हरकत घेतली. तहसीलदारांकडे रिव्हॉल्वरचा कोणताही परवाना नाही. दोन जानेवारीची घटना असताना पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही.
Video Player
00:00
00:00