पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं; सराव करताना दरदरुन घाम, रुग्णालयात मृत्यू, 4 महिन्यांचं बाळ पोरकं.

दुपारच्या वेळेस जवळच्या मैदानावर समीर पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीची तयारी करत होता. त्यानंतर अचानक अस्वस्थ वाटू लागले म्हणून तो घरी परतला.जिल्हाधिकारी कार्यालयात आवक-जावक विभागात काम करणाऱ्या 24 वर्षीय कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. समीर खान लाल खान असे मयत तरुणाचे नाव आहे. उष्माघाताने समीरला प्राण गमवावे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तो परभणी शहरातील कादराबाद प्लॉट येथील रहिवाशी होता. कंत्राटी पदावर कार्यरत असला तरी पोलीस बनण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे तो पोलीस भरतीची तयारी देखील करत होता, पण आता त्याची स्वप्नं अपूर्ण राहिली आहेत. याविषयी विस्तृत माहिती अशी की, समीर खान हा जिल्हाधिकारी कार्यालयातील आवक जावक विभागात कार्यरत होता.

मूळ रोजगार हमी योजनेवर कंत्राटी कर्मचारी म्हणून त्याची नियुक्ती होती. सोमवारी सायंकाळच्या सुमारास तो घरी गेला. प्रकृती अस्वस्थ जाणवत असल्याने समीरला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला अतिदक्षता विभागामध्ये हलविण्यात आले. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. सोमवारी सायंकाळच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. समीरचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.जिंतूर रोडवरील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आला. त्याचे लग्न दीड वर्षापूर्वीच झाले होते. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, चार महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. समीर खान हा कंत्राटी तत्वावर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होता.

तरुणाच्या अचानक मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.समीर खान हा जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात 8 वर्षापासून CDEO (क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर) या पदावर नियुक्त होता. दरम्यान, आवक जावक विभागात तो 2018 पासून कार्यरत होता. मागील काही दिवसांपासून तो पोलीस भरतीची तयारी देखील करत होता.सोमवारी (दि.14) डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने दुपारच्या वेळेस जवळपास तो मैदानावर पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीची तयारी करत होता. त्यानंतर अचानक अस्वस्थ वाटू लागले म्हणून तो घरी परतला. दरदरून घाम येऊन अंग गरम वाटल्याने नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने पोलिस बनण्याचे समीरचे स्वप्न अपूर्णच राहिले.

  • Related Posts

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेगळे वळण, एनआयएला मोठा संशय, २००० खेचर चालकांची चाैकशी.

    जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या तपासात एनआयएला (NIA) संशय खेचर चालकांवर आहे. हल्लेखोरांना त्यांनी मदत केली असावी, असा संशय आहे. सुमारे दोन हजार खेचर चालकांची चौकशी झाली आहे. दहशतवादी कोणत्या मार्गाने आले,…

    पहलगाममध्ये मानेला गोळी चाटून गेली, सुबोध पाटील मृत्यूशी झुंज जिंकले.; म्हणाले बेशुद्ध झालेलो, सद्गुरु कृपेने वाचलो.

    तीन-चार मिनिटातच गोळीबाराचा आवाज आला, आम्ही मागे पाहिलं, तर लोकं पळताना दिसली, त्यामुळे आम्हीही धावत सुटलो.” असं सुबोध पाटील सांगत होते.नवी मुंबई : जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेगळे वळण, एनआयएला मोठा संशय, २००० खेचर चालकांची चाैकशी.

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेगळे वळण, एनआयएला मोठा संशय, २००० खेचर चालकांची चाैकशी.

    पहलगाममध्ये मानेला गोळी चाटून गेली, सुबोध पाटील मृत्यूशी झुंज जिंकले.; म्हणाले बेशुद्ध झालेलो, सद्गुरु कृपेने वाचलो.

    पहलगाममध्ये मानेला गोळी चाटून गेली, सुबोध पाटील मृत्यूशी झुंज जिंकले.; म्हणाले बेशुद्ध झालेलो, सद्गुरु कृपेने वाचलो.

    …तर पाकिस्तानची अण्वस्त्रं एका झटक्यात अमेरिकेच्या ताब्यात; महासत्तेचा प्लान तयार.

    …तर पाकिस्तानची अण्वस्त्रं एका झटक्यात अमेरिकेच्या ताब्यात; महासत्तेचा प्लान तयार.

    पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळणार! यावेळी फुल अन् फायनल फैसला, भारत आवळणार आर्थिक नाडी.

    पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर मिळणार! यावेळी फुल अन् फायनल फैसला, भारत आवळणार आर्थिक नाडी.