बीड पुन्हा हादरलं! दिवसाढवळ्या भाजप कार्यकर्त्यावर कोयत्यानं वार, आरोपी स्वतः पोलिसांना शरण, काय घडलं नेमकं?

आरोपी नारायण शंकर फपाळ याने कोयता शर्टच्या पाठीमागे लपवून आणला होता. मयत बाबासाहेब आगे उभे असताना, अचानक त्यांच्यावर आरोपी नारायण शंकर फपाळ याने हल्ला केला. बाबासाहेब आगेंवर कोयत्याने सपासप वार करून त्यांचा खून करण्यात आला. खून केल्यानंतर स्वतः आरोपी नारायण शंकर फपाळ याने माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर होऊन हत्या केल्याची कबुली दिली.दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाने बीड पुन्हा एकदा हादरलं आहे. बीडच्या माजलगाव शहरात भर दिवसा तरुणाची धारदार कोयत्याने वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाबासाहेब आगे अस मयत तरुणाचं नाव आहे. खून करणारा आरोपी घटनेनंतर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला असून आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नारायण शंकर फपाळ असं आरोपीचे नाव आहे.

माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या जवळ भर वस्तीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. मयत बाबासाहेब आगे भाजपचा सक्रिय कार्यकर्ता होता. दोनच दिवसांपूर्वीच मंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेतल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य असलेले बाबासाहेब आगे हे आज (१५ एप्रिल) भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजप कार्यालय येथे आले होते. त्या कार्यालयाच्या समोरच त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.आरोपी नारायण शंकर फपाळ याने कोयता शर्टच्या पाठीमागे लपवून आणला होता. मयत बाबासाहेब आगे उभे असताना, अचानक त्यांच्यावर आरोपी नारायण शंकर फपाळ याने हल्ला केला. बाबासाहेब आगेंवर कोयत्याने सपासप वार करून त्यांचा खून करण्यात आला. खून केल्यानंतर स्वतः आरोपी नारायण शंकर फपाळ याने माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर होऊन हत्या केल्याची कबुली दिली.बीडमध्ये वाढत चाललेल्या या अराजकतेला आळा बसत नसल्याचे चित्र सध्या आहे. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील बरेचसे गुन्हे उघडकीस आले. परंतु गुन्हेगारांवर अद्यापही कायद्याचा वचक बसला नसल्याचेच दिसत आहे. दिवसाढवळ्या माणसांवर हल्ले होत असताना प्रशासन त्याविरोधात कठोर पाऊले उचलण्यात कमी पडत आहे का? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का नाही? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

  • Related Posts

    ‘युद्धाच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात टंगळ-मंगळ करत फिरतात’; संजय राऊत यांचं टीकास्त्र.

    काश्मीरमधील हल्ल्यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मोदी प्रचारसभांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. युद्धाच्या चर्चेदरम्यान मोदी अदानींसोबत दिसल्याने राऊत यांनी दुजाभाव दर्शवला. गृहमंत्र्यांच्या ‘घरात घुसून मारू’ या…

    खोलीचं दार उघडलं अन् समोर भयंकर दिसलं, परिक्षेच्या एक दिवस आधीच NEET च्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, काय घडलं नेमकं?

     अनिकेत अंकुश कानगुडे मागच्या दोन वर्षापासून लातूरच्या RCC कोचिंग क्लासेस येथे तयारी करत होता. दरम्यान मागच्या वेळी अनिकेत कानगुडे या विद्यार्थ्याला 520 च्या जवळपास मार्क मिळाले मात्र वैद्यकीय प्रवेश मिळाला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ‘युद्धाच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात टंगळ-मंगळ करत फिरतात’; संजय राऊत यांचं टीकास्त्र.

    ‘युद्धाच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात टंगळ-मंगळ करत फिरतात’; संजय राऊत यांचं टीकास्त्र.

    खोलीचं दार उघडलं अन् समोर भयंकर दिसलं, परिक्षेच्या एक दिवस आधीच NEET च्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, काय घडलं नेमकं?

    खोलीचं दार उघडलं अन् समोर भयंकर दिसलं, परिक्षेच्या एक दिवस आधीच NEET च्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, काय घडलं नेमकं?

    पती कामावरून आला, खिडकीतून घरात डोकावताच बसला धक्का; पत्नीसह ३ मुलींचे मृतदेह आढळले.

    पती कामावरून आला, खिडकीतून घरात डोकावताच बसला धक्का; पत्नीसह ३ मुलींचे मृतदेह आढळले.

    महिलेची नग्न बॉडी पोत्यात आढळली, पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगाने फिरवली, अखेर आरोपीला अटक, अन् कारण समोर.

    महिलेची नग्न बॉडी पोत्यात आढळली, पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगाने फिरवली, अखेर आरोपीला अटक, अन् कारण समोर.