धावत्या एसटी बसला अचानक आग; सोलापुरात बर्निंग बसचा थरार; भीषण घटनेत सुदैवाने..

 धावत्या एसटी बसने अचानकपणे पेट घेतल्याने सोलापूर अक्कलकोट महामार्गावर बर्निंग बसचा थरार पाहावयास मिळाला आहे. कुर्डुवाडी ते अक्कलकोट व्हाया सोलापूर या बसने पेट घेतला होता.धावत्या एसटी बसने अचानकपणे पेट घेतल्याने सोलापूर अक्कलकोट महामार्गावर बर्निंग बसचा थरार पाहावयास मिळाला आहे. कुर्डुवाडी ते अक्कलकोट व्हाया सोलापूर या बसने पेट घेतला होता. सोलापूरहुन अक्कलकोटकडे जाताना एसटी बसला कुंभारी टोल नाक्याच्या अलीकडे आग लागली. बसमध्ये ४५ ते ५० प्रवासी प्रवास करत होते. बस चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस थांबवून प्रवाशांना सुचित करत सुखरूप बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टाळली. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची प्राथमिक माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

यात बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास घडली आहे.कुर्डवाडीहुन अक्कलकोटकडे निघालेली बस सोलापूरला बस आली. सोलापूरहुन अक्कलकोट जाणारी एसटी (क्रमांक एम एच 20 बी एल 4215) ही कुंभारी टोलनाक्याजवळ पोहचली. अचानक इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करत वाहक व प्रवाशांना सूचना केली. बसमध्ये बसलेल्या ४५ ते ५० प्रवाशांनी ताबडतोब बसमधून खाली उतरले.

चालकाने माहिती देत सर्व प्रवासी वेळीच आपले सामान घेऊन आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडले. पाहता पाहता बसमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले व क्षणात आगीने उग्ररूप धारण केले. सोमवारी सायंकाळी सोलापूर अक्कलकोट महामार्गावर द बर्निंग बसचा थरार पाहावयास मिळाला.अग्निशामक दल व पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला असता आग वाढतच गेली. एसटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

  • Related Posts

    अमेरिका-पाकिस्तानसमोर झुकल्याचा आभास, विजय वडेट्टीवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात.

    काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणावर टीका केली. अमेरिकेपुढे झुकण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानचा उल्लेख वारंवार करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले. त्यांनी राज्य सरकारवर नुकसान भरपाई…

    गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त, मोठा शस्त्रसाठा जप्त.

    गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड 9 सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता.जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड 9  सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात घडवण्यासाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमेरिका-पाकिस्तानसमोर झुकल्याचा आभास, विजय वडेट्टीवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात.

    अमेरिका-पाकिस्तानसमोर झुकल्याचा आभास, विजय वडेट्टीवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात.

    गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त, मोठा शस्त्रसाठा जप्त.

    गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त, मोठा शस्त्रसाठा जप्त.

    पुण्यात भररस्त्यात तरुणीला संपवलं, शेजारीच निघाला मुख्य आरोपी.

    पुण्यात भररस्त्यात तरुणीला संपवलं, शेजारीच निघाला मुख्य आरोपी.

    आयपीएलच्या नवीन वेळापत्रकामुळे मुंबई इंडियन्सला गुड न्यूज, दोन सामने कुठे खेळवले जाणार, पाहा..

    आयपीएलच्या नवीन वेळापत्रकामुळे मुंबई इंडियन्सला गुड न्यूज, दोन सामने कुठे खेळवले जाणार, पाहा..