माझं नाव भाषणासाठी का नाही घेतलं? शिंदेंची विचारणा; म्हणजे? तुम्हाला काहीच कल्पना नाही.

कार्यक्रमपत्रिकेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांची भाषणे होतील, असा उल्लेख होता. त्यासाठी वेळदेखील ठरली होती. कार्यक्रम पत्रिकेनुसार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणासाठी प्रत्येकी ५ मिनिटे देण्यात आली होती. परंतु दोन्ही नेत्यांना यावेळी भाषणातून वगळण्यात आल्याचे पाहायला मिळाले.चैत्यभूमीवर सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल तसेच, मुख्यमंत्र्यांची भाषणे झाली, मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणे वगळण्यात आल्याचे पाहायला मिळाले. याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता आदल्या रात्रीच ही भाषणे वगळण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.महायुतीत सातत्याने विविध मुद्द्यांवर मतभेद असल्याचे पाहायला मिळत असून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणाऱ्या अर्थखात्याबाबत तक्रार केल्याचे समजते. अर्थखात्याकडून शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांच्या फायली वेळेवर मंजूर होत नसल्याची तक्रार शिंदे यांनी शहा यांच्याकडे केल्याचे कळते.

तर, यापुढे तसे होणार नाही, असे शहा यांनी शिंदे यांना आश्वस्त केल्याचे सांगितले जात आहे.नाराजीनाट्याची ही एक घटना ताजी असतानाच सोमवारी अशी आणखी एक घटना पहायला मिळाली. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुती सरकारमधील विविध मंत्री आणि नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंचावर आले. यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. नंतर राज्यपाल राधाकृष्णन यांनी भाषण केले.

विशेष म्हणजे, कार्यक्रमपत्रिकेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांची भाषणे होतील, असा उल्लेख होता. त्यासाठी वेळदेखील ठरली होती. कार्यक्रम पत्रिकेनुसार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणासाठी प्रत्येकी ५ मिनिटे देण्यात आली होती. परंतु दोन्ही नेत्यांना यावेळी भाषणातून वगळण्यात आल्याचे पाहायला मिळाले.भाषणासाठी आपले नाव घेण्यात न आल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारल्याचे समजते. त्यावर अधिकाऱ्यांनी तुमचे नाव भाषणाच्या पत्रिकेत नव्हते, असे सांगितले. शिंदे यांनी कार्यक्रमपत्रिकेचा दाखला दिला, परंतु संबंधित कार्यक्रम पत्रिकेत काल रात्रीच बदल करण्यात आले आणि नव्या कार्यक्रमपत्रिकेत केवळ राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे नाव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तुमचे नाव नसल्याची कल्पना तुम्हाला दिली नव्हती का, असा उलट प्रश्नच अधिकाऱ्याने शिंदेंना केला.

  • Related Posts

    दारुच्या गुत्त्यावर डिलिव्हरी बॉय पोहोचला, दुकानदारांनी खात्माच केला, प्रकरण काय?

    सूरजला दारूचे व्यसन होते. आणि तो नेहमी खडगाव रोडवरील सायरे देशी दारूच्या दुकानात दारू पिण्यासाठी जात असे. गेल्या काही दिवसांपासून सूरज दारूच्या दुकानातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत होता. नागपूरच्या वाडी पोलीस…

    जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन.

    समाजात कुणीही मागे राहू नये… आणि दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नव्हे, तर संधी मिळाली पाहिजे, जिल्हा वार्षिक नियोजन च्या सर्वसाधारण च्या निधीतील १% निधी आता दिव्यांग सक्षमीकरणासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दारुच्या गुत्त्यावर डिलिव्हरी बॉय पोहोचला, दुकानदारांनी खात्माच केला, प्रकरण काय?

    दारुच्या गुत्त्यावर डिलिव्हरी बॉय पोहोचला, दुकानदारांनी खात्माच केला, प्रकरण काय?

    जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन.

    जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन.

    मामा फॉरेनहून आला, मामी-भाच्याचं 5 वर्षांचं रिलेशनशीप फिस्कटलं, भांडणं वाढली अन् एक जीव गेला.

    मामा फॉरेनहून आला, मामी-भाच्याचं 5 वर्षांचं रिलेशनशीप फिस्कटलं, भांडणं वाढली अन् एक जीव गेला.

    याला माझे मित्र जबाबदार! महत्प्रयासानं ठरलेला प्रेमविवाह मोडला; अफवेमुळे तरुणानं जीव दिला.

    याला माझे मित्र जबाबदार! महत्प्रयासानं ठरलेला प्रेमविवाह मोडला; अफवेमुळे तरुणानं जीव दिला.