अमोल कीर्तिकर यांची रामदास कदम यांच्यासह सूर्यकांत दळवींवर टीका, म्हणाले, भाई, साहेब, दादा बनवलं ते सर्व…

रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्के बसत असताना, अमोल कीर्तिकर यांनी दापोलीत कार्यकर्त्यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे. मंडणगड येथे बोलताना, त्यांनी रामदास कदम, योगेश कदम आणि सूर्यकांत दळवी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘पक्षानं ज्यांना मोठं केलं, ते सोडून गेले, पण कार्यकर्ते आजही सोबत आहेत,’ असं ते म्हणाले. दापोलीत दौरे वाढल्याने, तेथील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठे धक्के बसत असतानाच आता उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते माजी खासदार गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र ठाकरे गटाचे युवा नेते अमोल कीर्तीकर यांच्याकडून दापोली विधानसभा क्षेत्रात बैठका घेत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.दापोली विधानसभा क्षेत्रातील मंडणगड तालुक्याच्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह सध्या भाजपामध्ये असलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावरही निशाणा साधला आहे. पक्षनेतृत्वाने शिवसेनेने त्यांना भाई, साहेब, दादा, राव बनवलं ते सोडून गेले.

कार्यकर्ते शिवसैनिक आहेत आणि तिथेच आहेत आणि ते माझ्यासमोर सगळे उपस्थित आहेत, अशा शब्दात त्यांनी तोफ डागली आहे. अलीकडे काही महिन्यांमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला दापोली विधानसभा क्षेत्रात धक्क्यावर धक्के बसले आहेत. त्यानंतर ठाकरे गटाचा डोलारा सांभाळायला अमोल कीर्तिकर सरसवल्याचे चित्र आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार संजय कदम यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने ज्या सूर्यकांत दळवींना दळवी साहेब बनवलं, ज्या रामदास कदम यांना रामदासभाई बनवलं ज्या योगेशला योगेश दादा बनवलं व संजय कदम यांना संजयराव बनवलं ते सगळे आज पदे घेऊन निघून गेले आहेत.

मात्र, ते ज्यांच्यामुळे बनले ते शिवसैनिक आजही जागेवर आहेत. अशा शब्दात अमोल कीर्तीकर यांनी एकाच वेळी चार नेत्यांवर निशाणा साधला आहे.काही दिवसांपासून अमोल कीर्तीकर यांचे दापोलीतील दौरे वाढले आहेत. कीर्तिकर आपल्या दापोली तालुक्यातील निवासस्थानी अनेकदा येत असतात. याच दरम्यान ते आता शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठक भेटीगाठी घेतात. मंडणगड तालुक्याच्या ठाकरे गटाचे बैठकीला अमोल कीर्तिकर उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे दापोली तालुकाप्रमुख ऋषी गुजर यांच्यासह मंडणगड तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते.अमोल कीर्तीकर यांनी केलेल्या टीकेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून व भाजपाकडून कोणते उत्तर दिले जाते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

  • Related Posts

    गौण खनिज उत्खनन केव्हा थांबणार, महसूल अधिकारी यांना प्रश्न?

    जळगाव शहरातील उजाड कुसुंबा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू आहे संबंधित तलाठी यांना फोन केला असता, ते परस्पर गौण खनिज उत्खनन करणारे यांना फोन करतात. ,आणि माहिती…

    ठाकरे बंधू, पवार काका-पुतणे एकत्र येत असतील तर मला अन् प्रकाश आंबेडकरांना एकत्र यावं लागेल; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य.

    शरद पवार आमच्या सोबत आले असते तर या देशाचे ते राष्ट्रपती होऊ शकले असते, आताही शरद पवारांचे स्वागतच आहे, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    गौण खनिज उत्खनन केव्हा थांबणार, महसूल अधिकारी यांना प्रश्न?

    गौण खनिज उत्खनन केव्हा थांबणार, महसूल अधिकारी यांना प्रश्न?

    ठाकरे बंधू, पवार काका-पुतणे एकत्र येत असतील तर मला अन् प्रकाश आंबेडकरांना एकत्र यावं लागेल; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य.

    ठाकरे बंधू, पवार काका-पुतणे एकत्र येत असतील तर मला अन् प्रकाश आंबेडकरांना एकत्र यावं लागेल; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य.

    शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा दुर्दैवी अंत; अहिल्यानगरमधील घटना.

    शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा दुर्दैवी अंत; अहिल्यानगरमधील घटना.

    इथली शिवसेना भाजपच्या दावणीला बांधण्यासाठीच हा निर्णय; परभणीत शिंदेंच्या शिवसेनेत घमासान.

    इथली शिवसेना भाजपच्या दावणीला बांधण्यासाठीच हा निर्णय; परभणीत शिंदेंच्या शिवसेनेत घमासान.