दोघे भाऊ एकत्र गेले, एक परत आलाच नाही, दुसरा गंभीर; नाशिकच्या हॉटेलमध्ये भयंकर घडलं.

नाशिकमध्ये दोन भावांवर मद्यपींकडून हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यात हल्ल्यात एका भावाचा मृत्यू झाला आहे, तर एक गंभीर जखमी आहे.राज्यभरात मारहाण, चोरीच्या, हत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज राज्यभरातील विविध भागातून लहान-मोठ्या कारणातून गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचं चित्र आहे. अशीच एक भयंकर घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. शहरातील पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या फाळके स्मारकजवळील एका हॉटेलमध्ये मद्यपींच्या सहा जणांच्या टोळक्याकडून दोन चुलत भावांना मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे.या मारहाणीत राम बोराडे (२०) याचा मृत्यू झाला आहे. तर राजेश बोराडे हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांकडून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये पाच ते सहा मद्यपी बसले होते. तिथेच दोघे चुलत भाऊदेखील बसले होते. तेथील मद्यपींकडून आमच्याकडे रागाने का बघतो म्हणून दोन चुलत भावांशी वाद घालण्याचा प्रयत्न झाला. हा वाद टोकाला पोहोचला. वाद इतका टोकाला पोहोचला, की त्याचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं.पाच ते सहा मद्यपींच्या टोळक्याकडून कोयत्याने दोन भावांवर वार करण्यात आले. राम बोराडे आणि त्याचा चुलत भाऊ राजेश बोराडे या दोघांवर पाच ते सहा जणांनी कोयत्याने सपासप वार करण्यात केले. या हल्ल्यामध्ये राम बोराडे याचा जागीच मृत्यू झाला असून राजेश बोराडे हा गंभीर जखमी झाला आहेत. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दोन भावांवर हल्ला केल्यानंतर या टोळक्याने परिसरातील काही चारचाकी वाहनांची देखील तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा संशयितांना अटक करण्यात आल्याचा दावा केला आहे.

  • Related Posts

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    पाकिस्तानने त्यांची राजधानी वाचवण्यासाठी पावले उचलली असून लाहोर ते इस्लामाबाद या क्षेत्रात विमानांना उड्डाणबंदी घालण्यात आली आहे.  पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आता पाकिस्तानची सर्व बाजूने कोंडी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम…

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

     पंतप्रधान मोदींकडे  प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त करत पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी आपल्याच देशाला सतर्कता बाळगण्याची सूचना केलीय.जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

    खून का बदला खून! नाशिकमधील अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर.

    खून का बदला खून! नाशिकमधील अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर.

    महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे झेंडावंदन करणार, भरत गोगावले समर्थक भडकले; म्हणाले, पालकमंत्री नसताना…

    महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे झेंडावंदन करणार, भरत गोगावले समर्थक भडकले; म्हणाले, पालकमंत्री नसताना…