धक्कादायक! बीड जिल्हा रुग्णालयात दुसऱ्या दिवशीही मातेचा मृत्यू, एका आठवड्यात तीन महिलांनी जीव गमावला.

बीड जिल्हा रुग्णालयात एकाच आठवड्यात तीन मातांचा मृत्यू झाला आहे. आज बीडच्या जिल्हा रुग्णालयात एका मातेचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयात चाललंय काय? असा सवाल उपस्थित होतोय.राज्यात माता मृत्यूमध्ये वाढ होत आहे. बीड जिल्हा रुग्णालयात एकाच आठवड्यात तीन मातांचा मृत्यू झाला आहे. आजबीडच्या जिल्हा रुग्णालयात एका मातेचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयात चाललंय काय? असा सवाल उपस्थित होतोय. आठवड्यातील ही तिसरी घटना आहे.रुक्‍मीन परशुराम टोने असे मयत मातेचे नाव आहे. 13 एप्रिल रोजी सकाळी रुक्मिणी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे सिजर झाले. यादरम्यान त्यांनी 2300 ग्राम वजनाच्या मुलाला जन्म दिला.

त्यांच्यावर आयसीयु विभागात उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुक्मिणी यांना पूर्वीपासून हृदयाशी संबंधित आजार असल्याचं सांगण्यात आले आहे. तसेच रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना रेफरचा सल्लाही देण्यात आला होता. परंतु ते गेले नाहीत. मात्र सलग दुसऱ्या दिवशी एका मातेचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयात चालले काय? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.छाया गणेश पांचाळ यांचे एक दिवसापूर्वीच निधन झाले होते.डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. प्रसुतीसाठी पैशाची मागणी केली २००० रुपये देऊनही प्रसुती योग्यरित्या केली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.कुटुंबियांनी उपस्थित केले प्रश्नछाया यांना अतिरक्तस्राव सुरू झाल्याने डॉक्टरांनी रक्त तपासणीसाठी पाठवले. नातेवाईकांना रक्ताची पिशवी आणण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. नॉर्मल डिलव्हरीमध्ये रक्तस्त्राव झाला कसा आणि रुग्णाची प्रकृती गंभीर असताना नातेवाईकांना बाहेरून रक्त आणण्यास का सांगितले. असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तेथील कर्मचाऱ्यांनीही उपचारादरम्यान सहकार्य केले नसल्याचा आरोप छाया यांच्या पतीने केला आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील या धक्कादायक प्रकाराचा तपास करुन दोंषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत.

  • Related Posts

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    पाकिस्तानने त्यांची राजधानी वाचवण्यासाठी पावले उचलली असून लाहोर ते इस्लामाबाद या क्षेत्रात विमानांना उड्डाणबंदी घालण्यात आली आहे.  पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आता पाकिस्तानची सर्व बाजूने कोंडी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम…

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

     पंतप्रधान मोदींकडे  प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त करत पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी आपल्याच देशाला सतर्कता बाळगण्याची सूचना केलीय.जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

    मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .

    खून का बदला खून! नाशिकमधील अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर.

    खून का बदला खून! नाशिकमधील अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर.

    महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे झेंडावंदन करणार, भरत गोगावले समर्थक भडकले; म्हणाले, पालकमंत्री नसताना…

    महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे झेंडावंदन करणार, भरत गोगावले समर्थक भडकले; म्हणाले, पालकमंत्री नसताना…