कलाविश्वावर शोककळा! ज्येष्ठ अभिनेत्याचं निधन, वयाच्या ७७व्या वर्षी घेतला जगाचा निरोप.

प्रसिद्ध ज्येष्ठ कन्नड अभिनेते बँक जनार्दन यांचं ७७व्या वर्षी निधन झालं आहे.विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ओळखले जाणारे आणि संस्मरणीय सहाय्यक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कन्नड अभिनेते बंका जनार्दनन आता या जगात राहिले नाहीत. रविवार, १३ एप्रिलच्या रात्री त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते बऱ्याच काळापासून आजारी होते आणि आरोग्याशी संबंधीत समस्यांमुळे त्रस्त होते. त्यांना बेंगळुरूतील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.२०२३ मध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानंतर बँक जनार्दन यांना आरोग्याच्या समस्या येऊ लागल्या. त्यावेळी ते बरे होत असले तरी, वयाशी संबंधित आजारामुळे त्यांची प्रकृती हळूहळू बिघडत गेली. त्यांचं पार्थिव आज संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत सुलतानपाल्य येथील त्यांच्या निवासस्थानी जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येईल.

१९४८ मध्ये बेंगळुरू येथे जन्मलेले बँक जनार्दनन हे कन्नड चित्रपटसृष्टीतील एक घराघरात लोकप्रिय नाव होतं. ते त्यांच्या सहाय्यक भूमिका आणि अचूक विनोदाच्या टायमिंगसाठी ओळखले जात होते. त्यांनी ५०० हून अधिक चित्रपट आणि अनेक टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांची कारकीर्द चार दशकांहून अधिक काळ चालली, त्या काळात त्यांनी विनोदी आणि वडील अशा दोन्ही भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयात साधेपणा दिसून आला, ज्यामुळे ते मनोरंजन जगताचे एक प्रसिद्ध स्टार बनले.

जनार्दन यांचा अभिनय प्रवास रंगभूमीपासून सुरू झाला आणि बँकेत काम केल्यामुळे त्यांच्या अभिनय कारकिर्दीत काही काळ व्यत्यय आला. त्यामुळे त्यांना “बँक जनार्दन” हे आडनाव मिळालं. त्यांनी ‘श्श्श’, ‘तरले नान मगा’, ‘बेलियप्पा बंगारप्पा’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.अशातच आता, बँक जनार्दन यांच्या निधनानं कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाने अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेक कलाकार आणि चाहते ट्विटर आणि इन्स्टाग्रामद्वारे पोस्ट करून दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

  • Related Posts

    आर्द्रतेमुळे अस्वस्थता वाढणार, मे महिन्यातील पहिल्या दहा दिवसांचा अंदाज काय? तज्ज्ञांनी दिली माहिती.

    मे महिन्यात मध्य भारत आणि वायव्य भारतात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. मुंबईत आर्द्रता वाढली असून उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता असून, पुढील चार ते पाच दिवसांत…

    नगरकरांचे ‘काका’ हरपले, संग्राम जगताप यांना पितृशोक, माजी आमदार अरुण जगताप यांचे पुण्यात निधन.

    नगरच्या राजकारणातील एक मोठं नावं म्हणून अरुण जगताप यांच्याकडे पाहिलं जायचं. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून अरुण काकांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली.अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील आणि माजी आमदार अरुणकाका जगताप…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आर्द्रतेमुळे अस्वस्थता वाढणार, मे महिन्यातील पहिल्या दहा दिवसांचा अंदाज काय? तज्ज्ञांनी दिली माहिती.

    आर्द्रतेमुळे अस्वस्थता वाढणार, मे महिन्यातील पहिल्या दहा दिवसांचा अंदाज काय? तज्ज्ञांनी दिली माहिती.

    नगरकरांचे ‘काका’ हरपले, संग्राम जगताप यांना पितृशोक, माजी आमदार अरुण जगताप यांचे पुण्यात निधन.

    नगरकरांचे ‘काका’ हरपले, संग्राम जगताप यांना पितृशोक, माजी आमदार अरुण जगताप यांचे पुण्यात निधन.

    ‘देश सृजनतेचा स्रोत’, जगाची क्रिएटिव्ह सुपरपॉवर म्हणून भारत सज्ज; ‘वेव्ह्ज २०२५’ परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान मोदींचे उद्गार.

    ‘देश सृजनतेचा स्रोत’, जगाची क्रिएटिव्ह सुपरपॉवर म्हणून भारत सज्ज; ‘वेव्ह्ज २०२५’ परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान मोदींचे उद्गार.

    प्ले ऑफमधून बाहेर पडताच राजस्थानला मोठा धक्का, संघाचा स्टार गोलंदाज स्पर्धेतून आऊट.

    प्ले ऑफमधून बाहेर पडताच राजस्थानला मोठा धक्का, संघाचा स्टार गोलंदाज स्पर्धेतून आऊट.