बोगस दस्तऐवजांचा सूत्रधार मेश्राम, अधीक्षकांसह आणखी तिघे गजाआड.

या प्रकरणात कट रचून फसवणूक केल्यासह विविध कलमान्वये सदर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पोलिसांनी उल्हास नरड आणि मुख्याध्यापक पराग पुडके या दोघांना शुक्रवारी गडचिरोली येथून अटक केली. दोघांचीही दोन दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली. चौकशीदरम्यान नीलेश मेश्राम याने नियुक्तीचे बनावट दस्तऐवज तयार करण्यासाठी पराग पुडके यांच्याकडून १० लाख रुपये घेतल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पदोन्नतीचा प्रस्ताव उपसंचालक कार्यालयात आला.बनावट शालार्थ आयडीच्या  आधारे अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पात्र ठरविण्याच्या प्रकरणाचा सूत्रधार माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक नीलेश मेश्राम याने बोगस दस्तऐवज तयार करून दिल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली. बनावट शालार्थ आयडी प्रकरणात सदर पोलिसांनी नीलेश मेश्राम याच्यासह आणखी तिघांना गजाआड केले. याप्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. संजय शंकरराव दुधाळकर ( वय ५३ ), सूरज पुंजाराम नाईक ( वय ४० ),अशी अटकेतील अन्य आरोपींची नावे आहेत. संजय हा उपसंचालक कार्यालयात शिक्षण उपनिरीक्षक तर सूरज हा लिपीक आहे.

२०१० मध्ये मुख्याध्यापक पराग पुडके याला शिक्षकपदाचा अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसताना थेट मुख्याध्यापक बनविण्यात आले. यासाठी नागपुरातील यादवनगरात असलेल्या एस. के. बी. उच्च प्राथमिक माध्यमिक विद्या मंदिर शाळेत तो शिक्षक असल्याचे बनावट कागदपत्र तयार करण्यात आले. या बनावट कागदपत्राच्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांनी त्याला भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील नानाजी पुडके विद्यालयात मुख्याध्यापक पदावर मंजुरी दिली. त्यापूर्वी त्याचे शालार्थ आयडी तयार करण्यासाठीही मंजूरी दिली होती.या प्रकरणात शिक्षण उपसंचालक, वेतन अधीक्षक, शिक्षणाधिकारी, वेतन निश्चिती अधिकारी तसेच इतर अधिकारी यांनी पैसे घेऊन पुडके यांच्या नावाने बनावट प्रस्ताव तयार केला, असे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात कट रचून फसवणूक केल्यासह विविध कलमान्वये सदर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पोलिसांनी उल्हास नरड आणि मुख्याध्यापक पराग पुडके या दोघांना शुक्रवारी गडचिरोली येथून अटक केली. दोघांचीही दोन दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली.चौकशीदरम्यान नीलेश मेश्राम याने नियुक्तीचे बनावट दस्तऐवज तयार करण्यासाठी पराग पुडके यांच्याकडून १० लाख रुपये घेतल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पदोन्नतीचा प्रस्ताव उपसंचालक कार्यालयात आला. त्याआधारे उल्हास नरड यांनी संजय आणि सूरजच्या मदतीने त्याचा शालार्थ आयडी तयार केला. या प्रकरणात शिक्षण विभागातील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

  • Related Posts

    मा. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा मनसेकडून वृक्षारोपणाचा उपक्रम..

    मा. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा मनसेकडून वृक्षारोपणाचा उपक्रम..महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी एक प्रेरणादायी उपक्रम…

    दोन ट्रॅक्टर आणि साहित्य केले जप्त एरंडोल तहसीलदार यांची कारवाई.

    आज मौजे कढोली तालुका एरंडोल येथे महसूल पथकाने सलग दुसऱ्या दिवशी अवैध वाळू उपसा विरुद्ध धडक कारवाई करत वाळू उपसा करणाऱ्या दोन ट्रॅक्टर, 2 केनी मशीन , दोर खंड व…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मा. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा मनसेकडून वृक्षारोपणाचा उपक्रम..

    मा. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा मनसेकडून वृक्षारोपणाचा उपक्रम..

    दोन ट्रॅक्टर आणि साहित्य केले जप्त एरंडोल तहसीलदार यांची कारवाई.

    दोन ट्रॅक्टर आणि साहित्य केले जप्त एरंडोल तहसीलदार यांची कारवाई.

    आजोबाशेजारी झोपलेली नात सकाळी गायब, गावभर शोधली अन् घराच्या शेजारीच… सोलापूरमध्ये खळबळ.

    आजोबाशेजारी झोपलेली नात सकाळी गायब, गावभर शोधली अन् घराच्या शेजारीच… सोलापूरमध्ये खळबळ.

    रुबी हॉल किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये डॉ. अजय तावरेही सहभागी, पोर्श अपघात केसनंतर पुन्हा कचाट्यात.

    रुबी हॉल किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये डॉ. अजय तावरेही सहभागी, पोर्श अपघात केसनंतर पुन्हा कचाट्यात.