जामखेडच्या दोन मित्रांचा पिंपरीत एकाच झाडाला एकाचवेळी गळफासघेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

जामखेडच्या दोन मित्रांनी पिंपरीत एकाच झाडाला एकाचवेळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आले आहे. जामखेडमधून पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या दोन मित्रांनी एकाच झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवलंय. मोशीतील निर्जनस्थळी जात दोघांनी टोकाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोघांच्या आत्महत्याचे कारण काय? याबाबत पोलिसांनी तपास सुरु केलाय. 1) तुषार अशोक ढगे वय 25 वर्ष  2) सिकंदर सल्लाउद्दीन शेख वय 30 वर्ष (राहणार हुंडा पिंपळगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. मयत तुषार यांचा चुलता दत्तात्रय रावसाहेब ढगे राहणार सणसवाडी तालुका शिरूर यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे दोघे एकमेकांचे मित्र असून काल मूळ गावावरून पुण्याला आल्याचे समजले आहे…

एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील  भारतमाता चौकाजवळील खिरीड वस्ती, मोशी या ठिकाणी आज रोजी (दि.12) एका लिंबाच्या झाडाच्या एकाच फांदीला दोन इसमांनी गळफास घेतला आहे. दोघांच्या मृत्यूची चौकशी करीत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.अधिकची माहिती अशी की, जामखेडच्या दोन मित्रांनी एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केलीये. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना आज सकाळी (दि.12) उघडकीस आली. हे दोघे ही चालक आहेत, मात्र त्यांनी एकत्रित आत्महत्या का केली असावी? याचं कारण अद्याप ही अस्पष्ट आहे. मोशीतील निर्जनस्थळी दोघांनी एकाच झाडाला एकाचवेळी गळफास घेतल्यानं हळहळ व्यक्त केली जातीये. ते जामखेडवरुन मोशीत कधी आले? कशासाठी आले?

अन आत्महत्या का केली? याचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस करतायेत.वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेले दोन मित्र अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातले आहेत. मात्र, त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही अचानक गावावरुन पिंपरी चिंचवडमध्ये आले आणि त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलाय. दोघांनी आत्महत्या का केली? याबाबतचा तपास आम्ही करत आहोत.

  • Related Posts

    चाकणमध्ये महिलेने शतपावली करणाऱ्या व्यक्तीला पाहून आरडाओरडा केला पण…

    महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडाही केला, मात्र तिच्या मदतीला कुणी धावलं नाही. त्याभागात काहीजण चालण्यासाठी आलेले होते, त्यांनाही हा प्रकार लक्षात आला नाही अशी माहिती आहे.राज्यभरात पुन्हा एकदा अत्याचाराच्या…

    छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 किलो सोनं अन् 40 किलो चांदी लुटली, बड्या उद्योजकाच्या घरावर दरोडा.

    वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील उद्योजक संतोष राधाकिशन लड्डा यांच्या निवासस्थानी मोठा दरोडा पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील उद्योजक संतोष राधाकिशन लड्डा यांच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    चाकणमध्ये महिलेने शतपावली करणाऱ्या व्यक्तीला पाहून आरडाओरडा केला पण…

    चाकणमध्ये महिलेने शतपावली करणाऱ्या व्यक्तीला पाहून आरडाओरडा केला पण…

    छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 किलो सोनं अन् 40 किलो चांदी लुटली, बड्या उद्योजकाच्या घरावर दरोडा.

    छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 किलो सोनं अन् 40 किलो चांदी लुटली, बड्या उद्योजकाच्या घरावर दरोडा.

    शेण टाकायला गेली, गावातल्या मद्यपीनं काढली तरुणीची धिंड, बेदम मारहण, अश्लील शिवीगाळ, भंडाऱ्यात धक्कादायक प्रकार.

    शेण टाकायला गेली, गावातल्या मद्यपीनं काढली तरुणीची धिंड, बेदम मारहण, अश्लील शिवीगाळ, भंडाऱ्यात धक्कादायक प्रकार.

    मूलबाळ होत नाही म्हणून नवस करायला गेली, आळंदीतील लॉजवर विवाहितेवर अत्याचार, दाम्पत्यासह तिघांना अटक.

    मूलबाळ होत नाही म्हणून नवस करायला गेली, आळंदीतील लॉजवर विवाहितेवर अत्याचार, दाम्पत्यासह तिघांना अटक.